शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बेकायदा खासगी बसना राज्यात प्रवेश बंद, आच्छाड येथे आरटीओ तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 2:37 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गाने परराज्यातून महाराष्ट्रात  प्रवेश करणाऱ्या बेकायदा लक्झरी बस, तसेच प्रवासी वाहनांची प्रादेशिक परिवहन खात्याकडून (आरटीओ) आच्छाड सह्याद्री हॉटेलजवळ सक्तीने तपासणी केली जात आहे.

- शाैकत शेखडहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गाने परराज्यातून महाराष्ट्रात  प्रवेश करणाऱ्या बेकायदा लक्झरी बस, तसेच प्रवासी वाहनांची प्रादेशिक परिवहन खात्याकडून (आरटीओ) आच्छाड सह्याद्री हॉटेलजवळ सक्तीने तपासणी केली जात आहे. बेकायदा प्रवासी वाहनांना पुन्हा परत पाठवण्यात येत आहे. १ एप्रिलपासून परिवहन खात्याकडून ही तपासणी मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांना अन्य वाहनांतून अपेक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे बेकायदा प्रवासी वाहनांना महाराष्ट्रात मज्जाव करण्यात आला आहे.  गुजरात, राजस्थान, दिल्ली इत्यादी राज्यांतून दररोज हजारो लक्झरी बस प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून प्रवेश करीत होत्या. यापूर्वी या लक्झरी बसवर दंडात्मक कारवाई आरटीओ विभागाकडून केली जात होती. पण, दिवसेंदिवस ती बेकायदा वाहतूक वाढत जात होती. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यांच्या सीमेवर असलेल्या आच्छाडजवळ आरटीओ अधिकारी तैनात करून परराज्यातील बेकायदा लक्झरी बस रिकाम्या करून त्यांना परत पाठवले जात आहे.  लक्झरी बसला १२ मीटर लांबीची परवानगी आहे. मात्र, लक्झरी बसमधून जास्त पैसे कमावण्यासाठी लक्झरीमालक  क्षमतेपेक्षा जास्त लांब बनवून तसेच क्षमतेपेक्षा जास्त आसन तयार करतात. त्याला कायदेशीर परवानगी नसताना परवानगीपेक्षा जास्त लांबीचे तसेच क्षमतेपेक्षा अधिक आसनक्षमता तयार करून आंतरराज्यातून महाराष्ट्रात  बेकायदा प्रवेश करणाऱ्या वाहनांना १ एप्रिलपासून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांना परिवहन खात्याकडून प्रतिबंध केला आहे.  दरम्यान, दापचरी सीमा तपासणी नाक्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धावणाऱ्या लक्झरी बसची कसून तपासणी करून कायदेशीर बसना प्रवेश दिला जात असल्याचे तेथील अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे बसना सीमेवरूनच मागे फिरावे लागत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस