डहाणू : या तालुक्यातील आगवन येथे चंदू जगन घोलसाडा याने बायकोचा गळा आवळून तिला जमिनीवर आपटल्याने शालूचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.गंजाड दसरापाडा येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास माथेफिरू आरोपी विकास पोवार याने डोक्यात रॉड मारून जखमी केलेल्या शेवंती उर्फ लाडकी गावित हिचा उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. काल तो नेहमी प्रमाणे कामावरुन घरी आला असता त्याने रागाच्या भरात आपली सखी आजी मीना पवार व चुलत आजी गिरीजा पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने ठेचून हत्या केली व त्याने तेथून रस्त्यावरुन लाकडाची मोळी घेऊन जात असलेल्या तर दरम्यान गंजाड येथील गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शेवंती उर्फ लाडकी गावीत हिलाही गंभीर जखमी केले होते. तिला सोमावारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु ती कोमात गेल्याने पुढील उपचारासाठी विनोबा भावे रु ग्णालय सिल्व्हासा येथे उपचार सुरु असताना ती मरण पावली. याबाबत खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर तसेच पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे हे करीत आहेत. (वार्ताहर)
आगवण येथे पतीने केला पत्नीचा खून
By admin | Updated: March 22, 2017 01:17 IST