लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- बायकोच्या व्हाट्सअप स्टेटस वर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेचार वाजता नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे ही घटना घडली. आफताब शेख (२४) असे या हल्ल्यात मरण पावलेल्याचे नाव आहे.
नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे आफताब शेख (२४) हा पत्नी शबाना शेख (२२) हिच्यासोबत रहात होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे फातिमा शबानाने आपल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवले होते. ते स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (२२) याने कमेंट केली होती. याच मुद्द्यावरून त्यानंतर मेहंदी याने तिशबानाला इंस्टाग्राम या समाज माध्यमाव अश्लील शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी शबाना शेख आणि तिचा नवरा आफताब शुक्रवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील मेहंदी हसनच्या घरी गेले होते.
त्यावेळी त्यावेळी झालेल्या वादातून मेंहदीने चाकूने आफताब शेख याच्यावर वार केले. त्यात त्याचा जागेच मृत्यू झाला. नालासोपारा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मेहंदी हसन शेख याला अटक केली. तो सराईत गुन्हेगारा असून यापूर्वी त्याला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली होती. आरोपी आणि मयत हे पूर्वी एकमेकांच्या शेजारी राहत होते. स्टेटस ठेवण्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली.
Web Summary : A man was murdered in Nalasopara after confronting a youth who made an obscene comment on his wife's WhatsApp status. The accused, Mehndi Hasan Sheikh, stabbed Aftab Sheikh to death during an argument. Police arrested Mehndi, a repeat offender previously arrested under POCSO.
Web Summary : नालासोपारा में पत्नी के व्हाट्सएप स्टेटस पर अश्लील कमेंट करने वाले युवक का विरोध करने पर एक व्यक्ति की हत्या कर दी गई। आरोपी मेहंदी हसन शेख ने आफताब शेख की बहस के दौरान चाकू मारकर हत्या कर दी। पुलिस ने मेहंदी को गिरफ्तार किया, जो पहले भी पोक्सो के तहत गिरफ्तार हो चुका है।