शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

अमानुषता: चिमुकल्यास हवेत गरगर फिरवून तीन वेळा डोक्यावर आपटले, मुलाला रक्ताच्या उलट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 07:49 IST

किरकोळ भांडणाचा डूख धरून बसलेल्या आरोपीने चार वर्षीय मुलाला हवेत गरगर फिरवून तीन वेळा डोक्यावर आपटले

नालासोपारा: वसई येथे सुडाग्नीने पेटलेल्या एका माथेफिरूने निरागस मुलाच्या बाबतीत क्रौर्याची परिसीमा गाठणारे अधम कृत्य केले. किरकोळ भांडणाचा डूख धरून बसलेल्या आरोपीने आपल्याच इमारतीतील रहिवाशाच्या चार वर्षीय मुलाला हवेत गरगर फिरवून तीन वेळा डोक्यावर आपटले. ही संतापजनक घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी घडली.

या लहानग्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला मिरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आरोपी रिक्षाचालकावर तसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या या निर्दयी कृत्याबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वसई पश्चिमेच्या अनुपम घर संकुल सोसायटीत राहणारे अतुल कोंढारे यांचा त्याच सोसायटीत राहणारा रिक्षाचालक आरोपी संदीप पवार याच्याशी काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्याचा डूख त्याने धरला होता. कोंढारे यांचा मुलगा विघ्नेश सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता सोसायटीतील मुलांसह खेळत होता. खेळता खेळता तो रिक्षात बसला. त्याचवेळी आरोपी संदीप रिक्षाजवळ आला. त्याने इतर मुलांना हुसकावले आणि विघ्नेशला पकडून त्याचे डोके रिक्षाच्या लोखंडी अँगलवर आपटले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने विघ्नेशचा पाय धरून त्याला रिक्षातून जोरात खेचले आणि त्याचे दोन्ही पाय पकडून हवेत फिरवत डोक्यावर आपटले. विघ्नेशला रुग्णालयात नेले तेव्हा त्याने रक्ताच्या उलट्या केल्या.

अंगावर काटा आणणारा गुन्हा 

आरोपीने विघ्नेशला दोन-तीन वेळा जमिनीवर आपटले आणि त्याच्या पायाला धरून जिन्यावरून पहिल्या मजल्यावर फरफटत नेले आणि मारहाण केली. विघ्नेशच्या आजीने त्याचा प्रतिकार केला असता आरोपीने तिलाही मारहाण केली. सोसायटीच्या सीसीटीव्हीत हा घटनाक्रम चित्रित झाला आहे.

६ वर्षीय मुलावर १३ वर्षीय मुलाचा अत्याचार

नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ६ वर्षाच्या बालकावर १३ वर्षीय मुलाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी आरोपी मुलावर 'पोक्सो'न्वये गुन्हा दाखल करून, त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. पीडित बालकाच्या वागण्यात काही दिवसांपासून बदल झाल्याचे त्याच्या आईच्या निदर्शनास आले. मुलगा घाबरलेला आणि अस्वस्थ असल्याने आईने त्याला विश्वासात घेतले असता त्याने घडलेला प्रकार कथन केला. आरोपी मुलगा या बालकाला इमारतीच्या बाजूला निर्जन स्थळी घेऊन जात असे आणि तिथे त्याला मारहाण करण्याची दमदाटी करून त्याच्यावर अत्याचार करत असे. पीडित मुलाच्या पालकांनी तातडीने नेरळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा नोंदवला. या घटनेमुळे नेरळ आणि परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नोकरीची धमकी देत लैंगिक संबंधांची मागणी

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (केडीएमसी) एका लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडे लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीवरून काढण्याची धमकी देत त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात लिपिक भूषण पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारीत एका कामावरून भूषण पाटील आणि पीडिता यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी पाटील याने सर्वासमक्ष महिलेला शिवीगाळ केली होती. त्यानंतर २० फेब्रुवारीला रात्री पाटील याने महिलेला फोन केला. "तुला आणि अन्य एका कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याची ऑर्डर आली आहे. दुसऱ्या कर्मचाऱ्याने 'सेटलमेंट' केली आहे, तू काय करणार?" अशी विचारणा त्याने केली आणि ऑर्डर रद्द करण्याच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या प्रकारानंतर पालिका प्रशासन लिपिकावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Barbarity: Child Thrown, Head Smashed; Vomits Blood After Attack

Web Summary : In Vasai, a man brutally attacked a 4-year-old boy due to a petty dispute. He threw the child, smashed his head multiple times, and dragged him. The boy is in critical condition; the accused is arrested.
टॅग्स :VirarविरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस