पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:21 AM2019-11-26T00:21:21+5:302019-11-26T00:21:52+5:30

अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे.

Help with farmers in the Government Office for crop insurance | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे

Next

वाडा : अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे. नुकसानीचे पंचनामेही झाले, मात्र नुकसानभरपाईबाबत शासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नसल्याने शेतकरी पीक विम्याची रक्कम तरी मिळावी यासाठी शासनाच्या कृषी कार्यालयात, तहसीलदार आणि कर्ज घेतलेल्या बँकेच्या अधिका-यांकडे हेलपाटे मारत असताना दिसून येत आहेत.

वाडा तालुक्यातील शेतकºयांचे भात हे एकमेव पीकअसून ते निसर्गावरच अवलंबून आहे. गतवर्षी येथील शेतकºयांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले होते. तर यावर्षी शेतकरी ओल्या दुष्काळात भरडला गेला आहे. नुकसानीचे पंचनामे झालेले असले तरी मदतीबाबत कुठलीच माहिती शेतकºयांना मिळत नसल्याने शेतकरी साशंक झाला आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही नाही सरकारची मदत मिळाली, नाही विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळाली. त्यामुळे यंदाही भरपाईपासून वंचित रहावे लागते की काय, अशी भीती शेतकºयांना भेडसावते आहे.

वाडा तालुक्यातील ५६४७ शेतकºयांनी न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडून विमा काढला आहे. तर काही शेतकºयांनी सेवा सहकारी संस्थाकडून कर्ज घेतानाच विम्याची रक्कम भरलेली आहे. नुकसान भरपाईबाबत शासन आणि प्रशासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नाहीत. भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी कुठले कागदपत्र, पुरावे कुठे सादर करावेत याबाबत माहिती मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत.

भरपाई संदर्भात कुठल्याच शासकीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला नसल्याने शेतकरी आता नुकसान झालेल्या भातपिकाचे फोटो, जमिनीचे सातबाराचे उतारे, विमा भरल्याची पावती तसेच अन्य पुराव्याचे कागदपत्र घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवितांना दिसून येत आहेत.

वाडा तालुक्यातील २१ हजार ६५० बाधित शेतकरी असून त्याचे एकूण १० हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे ८० ते ९० टक्के नुकसान झालेले आहे. अलिकडेच (१६ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खरीप पिकासाठी प्रती हेक्टरी आठ हजार तर फळबागासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत, शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ही मदत दोन हेक्टरपर्यंतच दिली जाणार आहे. राज्यपालांच्या निर्णयानुसार शेतकºयांना फक्त एकरी ३२०० रुपये नुकसानभरपाई म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हे काम आहे, अशी तिखट प्रतिक्रि या येथील शेतकरी नेते तथा कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे.

वाडा तालुक्यात खरीप पिकाचा विमा घेतलेल्या शेतकºयांची संख्या जास्त असल्याने येथे विमा कंपनीचे दोन स्वतंत्र्य अधिकाºयांची नेमणूक केली आहे.
-प्रवीण गवांदे, उपविभागीय
कृषि अधिकारी, वाडा

खरीप पिकाचा विमा काढताना आॅन लाईन सातबारा व अन्य कागदपत्र दिलेले असतानाही पुन्हा-पुन्हा वेगवेगळे कागदपत्र व नुकसानीचे पुरावे मागितले जात आहेत.
- नारायण परशुराम पाटील,
शेतकरी, पीक, ता.वाडा

Web Title: Help with farmers in the Government Office for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.