काजुपाडा खिंड ते वरसावे नाका घोडबंदर रस्ता दुरुस्तीसाठी २३ नोव्हेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी
By धीरज परब | Updated: November 21, 2025 22:53 IST2025-11-21T22:53:34+5:302025-11-21T22:53:49+5:30
धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्क मिरारोड - घोडबंदर मार्गावर काजू पाडा खिंड ते वरसावे नाका ह्या दरम्यान रस्त्याची दुरुस्तीसाठी ...

काजुपाडा खिंड ते वरसावे नाका घोडबंदर रस्ता दुरुस्तीसाठी २३ नोव्हेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी
धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरारोड - घोडबंदर मार्गावर काजू पाडा खिंड ते वरसावे नाका ह्या दरम्यान रस्त्याची दुरुस्तीसाठी २३ नोव्हेम्बर रोजी जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.
ठाण्या कडून वरसावे दिशेने येताना घोडबंदर मार्गावरील काजूपाडा खिंड ते वरसावे नाका रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सदर रस्ता दुरुस्ती हि ग्राऊटींग करून मास्टिक अस्फाल्ट ने केली जाणार आहे. मीरा भाईंदर महापालिका हे काम करणार असून शनिवारच्या मध्यरात्री नंतर रविवार २३ नोव्हेम्बर रोजी पूर्ण दिवस करीता जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तशी अधिसूचना मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय उपायुक्त अशोक वीरकर यांनी जारी केली आहे.
प्रवेश बंद- १) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- पालघर- विरार बाजूकडून येणाऱ्या अवजड वाहनांना शिरसाड फाटा पासून वरसावे बाजूकडे येण्यासाठी प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग - शिरसाड फाटा - पारोळ - अकलोली (गणेशपुरी )- अंबाडी मार्गे अवजड वाहने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद- २) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- पालघर- वसई बाजूकडून येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाक्यापासून वरसावे बाजूकडे येण्यासाठी प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग - चिंचोटी मार्गे कामण - खारबांव - अंजूरफाटा - भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद - ३) पश्चिम दृतगतीमार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणे करीता जाण्यासाठी प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग - सदर वाहने वर्सोवा ब्रिजवरुन सरळ गुजरात राष्ट्रीय महामार्गावरुन शिरसाड फाटा-पारोळ- अकलोली (गणेशपुरी) अंबाडी मार्गे किंवा चिंचोटी मार्गे कामण- खारबांव-अंजूरफाटा, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.