शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

तारापूरमध्ये हृदयरोग, अस्थमा अन् त्वचारोग, वायू गळतीचा जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 12:31 AM

तारापुर औद्योगिक क्षेत्रामध्ये वायुगळती व वायुप्रदूषणाचा जीव घेणा प्रवास सुरु असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची वेळीच उपाययोजना न केल्यास एक दिवस तारापुर गॅस चेम्बर बनून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

- पंकज राऊतबोईसर  - तारापुर औद्योगिक क्षेत्रामध्ये वायुगळती व वायुप्रदूषणाचा जीव घेणा प्रवास सुरु असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची वेळीच उपाययोजना न केल्यास एक दिवस तारापुर गॅस चेम्बर बनून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नेहमीच्या या वायुप्रदूषणामुळे हृदयरोग व अस्तमा याबरोबरच त्वचा आजारात मोठी वाढ झाली आहे.आॅक्टोबर २०१८ या महिन्यात तारापूर एम.आय. डि. सी.मध्ये एका कारखान्याच्या बागायतीतील झाडाजवळ असंख्य चिमण्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. एका नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात वाहत जाणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रासायनिक सांडपाण्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायु व उग्रवासामुळे चिमण्या मृत्यू पावल्या होत्या. तर, त्या चिमण्यांना पाणी पाजून वाचिवण्याचा प्रयत्न करणा-या तेथील टपरीचालकाला ही त्या उग्र वास व वायुचा त्रास होऊन चक्कर आली होती.जानेवारी २०१९ या महिन्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील ‘के’ झोन मधील बंद व जुन्या रासायनिक सांडपाण्याच्या पाईप लाईनमध्ये घातक रासायनिक सांडपाणी अनधिकृत पद्धतीने सोडल्याने त्या मधून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे त्या परिसरातील काम कारखान्यात काम करणा-या कामगारांना व रस्त्यावरून जाणा-या असंख्य नागरिकांना डोळ्याची जळजळ व श्वसनाचा त्रास इत्यादी प्रकारचे त्रास जाणवू लागल्याने कामगार काम बंद करून सुरिक्षत स्थळी पळाले होते.रविवारी (दि. ५ मे) बजाज हेल्थ केयर या कारखान्यात वायुगळती होऊन कामगारांना डोळ्याला त्रास झाला होता त्यांच्यावर बोईसर मधील वेगवेगळ्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत तर अजून काही महिन्या पूर्वी दोन वेगळ्या कारखान्यात वायुगळतीमुळे कामगारांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. या सर्व घटना गंभीर असून धोक्याची घंटा आहे परंतु सर्व यंत्रणा लालफितीत बुरसटली असल्याने एक दिवस भोपाळ होण्याची शक्यता आहे.वास्तविक, तारापूर येथील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एक कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे औद्योगिक क्षेत्रात रात्री दाट धूर पसरलेला असतो त्यामुळे काहीवेळा समोरचा रस्ता ही दिसत नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम अक्षरश: धाब्यावर बसवले जातात तर वायुगळती व वायु प्रदूषणामुळे कामगारांबरोबरच परिसरातील लाखो नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. याकडे लक्ष वेधले जात आहे.प्रक्रिया न करता होते औद्योगिक उत्सर्जन : देशातील एकूण मृत्यू पैकी काही टक्के मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होतो हे अनेक अहवालातून समोर आले आहे. तर, तारापूर येथे कारखान्यातून हवेवर प्रक्रि या न करता औद्योगिक उत्सर्जन केले जाते. त्याच प्रमाणे प्लास्टिक व अन्य कचºयाच्या ढिगाऱ्यांना आग लावून तो कचरा नष्ट करण्यात येत असून त्यामधून वायु प्रदूषण होते तर तारापूर एमआयडीसीमध्ये प्रदूषणाचे मोजमाप यंत्रणा कुचकामी ठरली आहे.स्क्र बर सिस्टीमक डे दुर्लक्ष : औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून सोडल्या जाणाºया विषारी वायूमुळे औद्योगिक क्षेत्रा बरोबरच परिसरातील गावांमध्ये वायुप्रदूषणाचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढला असून कारखान्यातून निघणाºया धुरामुळे वायू प्रदूषण होऊ नये म्हणून स्क्र बर सिस्टीम काटेकोरपणे चालविणे गरजेचे आहे परंतु ते खर्चिक असल्याने स्क्र बर बायपास करून प्रदूषित हवा सोडली जाते.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार