शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

हनुमान मंदिर - शिवाजी चौक रस्ता आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:53 AM

शिवाजी चौक पालघर ते हुतात्मा स्तंभ हा १ कोटी ६२ लाख किमतीचा रस्ता मंजूर झाला

पालघर : शिवाजी चौक पालघर ते हुतात्मा स्तंभ हा १ कोटी ६२ लाख किमतीचा रस्ता मंजूर झाला असून त्यातील हनुमान मंदिर ते शिवाजी चौक या रस्त्याच्या कामासाठी येथील वाहतूक १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदिर चौक ते हुतात्मा स्तंभ अशा या १.३५० किमी. लांबीच्या रस्त्यापैकी हुतात्मा स्तंभ ते हनुमान मंदिर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता सुमारे ५०० मीटर लांबी आणि ७ मीटर रुंदीच्या शिवाजी चौक रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यावर नेहमीच आजूबाजूच्या इमारतीमधील ड्रेनेजचे पाणी येत असल्याने हा रस्ता लवकर खराब होतो. त्यामुळेच या पूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण असून या कामासाठी नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागासह नगरपरिषद प्रशासनाने यानिमित्ताने केले आहेया मुख्य रस्त्यावर ११ जानेवारी ते १६ जानेवारी या ५ दिवसांत काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार होते. मात्र अनेक प्रयत्नानंतरही योग्य समन्वयाच्या अभावामुळे त्यातून मार्ग निघत नसल्यामुळे या रस्ता बांधणीचे काम त्यावेळी बारगळले होते. अलीकडेच नगरपरिषद पदाधिकारी, प्रशासन यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी प्रत्यक्षात पाहणी केली गेली. रस्ता बनण्यासाठी आवश्यक बाबी यांना नगरपरिषदेने मंजूर केल्यानंतर रस्त्याचे काम सुरू करण्याचे ठरले.या भागात नगरपरिषदेच्या असलेल्या जलवाहिनी स्थलांतर करावयाच्या असून त्यानंतरच या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. यासाठी खबरदारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या ठिकाणी फलक व सूचना लावून तो १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२० पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.