शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 12:08 AM

वसई तालुक्यातील निसर्ग संपदेने नटलेले तुंगारेश्वर अभयारण्य आता भकास होण्याच्या मार्गावर असून प्राण्यांची होणारी शिकार व अभयारण्यात वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.

पारोळ : वसई तालुक्यातील निसर्ग संपदेने नटलेले तुंगारेश्वर अभयारण्य आता भकास होण्याच्या मार्गावर असून प्राण्यांची होणारी शिकार व अभयारण्यात वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले; मात्र आता जंगलात शिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून पशू-पक्ष्यांच्या शिकारीसह दुर्मीळ सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. जंगलात वारंवार आगी लावण्यात येत आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यांत भूमाफियांनी अतिक्रमण करून जंगल गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका अभयारण्यातील पशू-पक्षी आणि त्यांच्या अधिवासाला बसतो आहे. दरम्यान, अपुरी साधनसामग्री आणि तोकडे मनुष्यबळ यामुळे तुंगारेश्वर अभयारण्याकडे लक्ष देण्यात अपयश येत असल्याचे वन विभागाचेच म्हणणे आहे.तुंगारेश्वर अभयारण्यात पूर्वी मोठ्या संख्येने वन्य प्राणी व पक्षी अधिवास करत होते. मात्र आता याकडे प्रशासन आणि वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने जंगलपट्टा नष्ट होऊन वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.  एकीकडे वाढते नागरीकरण व त्यातून उद्भवणारे अतिक्रमण यामुळे वन खात्याला आवश्यक असणारे वाढीव मनुष्यबळ न मिळाल्याने हा अनर्थ घडतो आहे. विविध झाडे, पशू व पक्ष्यांनी समृद्ध असलेल्या या अभयारण्यात मुरुड शेख, हरडा, सागवन, सावर, पळस, शिसव, बांबू, चिंच, खैर, अर्जुन, जांभूळ, बकुळी, राजन, काकड, मोह अशा विविध प्रकारच्या वनस्पती तसेच बिबट्या, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्यप्राणी तर पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकिळा, पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, शामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी असे २५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि शिकार यामुळे वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.अभयारण्यामधील बेकायदा बांधकामे व होणारी शिकार का प्रकारावर कारवाईची गरज आहे. जर वेळीच या प्रकाराला आळा बसला नाहीत तर येथील निसर्गसंपदा व वन्यजीव यांच्यासाठी धोक्याच आहे.- लक्ष्मीप्रसाद पाटील,महाराष्ट्र सचिव, पर्यावरण मित्र बहूद्देशीय संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरारforestजंगल