शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धरले हाताशी; पालघर नगर परिषदेची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:43 IST

मागील २० वर्षांपासून झालेल्या नगरपरिषद निवडणुका अगदी बारीक-सारीक कारणाने गाजत शांततेत पार पडल्या होत्या.

- हितेन नाईकपालघर : सत्ताधाऱ्यांनी आचारसंहितेला न जुमानता प्रशासनाला हाताशी धरीत लावलेली ताकद आणि दुसरी कडे सत्तेच्या ताकदी पुढे हतबल झालेले विरोधक व अपक्ष अशीच काहीशी निवडणूक पालघर नगरपरिषदेची झाल्याचे निदर्शनास आले असून सोमवारी होणा-या मतमोजणी दरम्यान मतदार कुणाचे नेतृत्व स्विकारतो याचे उत्तर मिळणार आहे.मागील २० वर्षांपासून झालेल्या नगरपरिषद निवडणुका अगदी बारीक-सारीक कारणाने गाजत शांततेत पार पडल्या होत्या. मात्र २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षातून आलेल्या डॉ. श्वेता पाटील-पिंपळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत अन्य बाहेरून आलेल्या पाच लोकांना सेनेची उमेदवारी दिल्याने उमेदवारी निश्चित झालेल्या सेनेतील १४ निष्ठावंतानी या निर्णया विरोधात बंड करून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.या अपक्ष उमेदवारांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क पाहता सेनेची सत्ता हातातून बाहेर जाऊ शकते हे सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे , भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि आ. रवींद्र फाटक यांना निदर्शनास येऊ लागले. सेना बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्या आपण यातून सकारात्मक तोडगा काढू हे आदेश अपक्षांनी नाकारल्याने निवडणुकीची सूत्रे सत्ताधाऱ्यांनी हाती घेतली. नगरपरिषद निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना निवडून आणा, मग पालघरमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य शासना कडून भरभरून निधी आणू हे आश्वासन देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना पालघर मध्ये आणण्यात आले. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मते मागण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांना पाचारण करावे लागले या वरुन पालघर नगरपरिषदेची निवडणूक किती ‘इज्जत का सवाल’ बनली याचा अंदाज मतदारांना आला होता.अपक्ष बंडखोरां कडे मतदारांचा असणारा कल पाहता नगराध्यक्ष उमेदवारासह युतीच्या अनेक उमेदवारांना फटका बसू शकतो याची कल्पना आल्यानंतर प्रलोभने, पैसे वाटपाचा कार्यक्र म शनिवारच्या रात्रीत सुरू झाला. पालघर-माहीम रस्त्यावरील एका बिल्डिंग मध्ये प्रभाग क्र मांक १० ब मधील शिवसेनेचा उमेदवार अक्षय संखे हा काही लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मतदारांना प्रलोभने दाखवीत असल्याची शंका व्यक्त करीत त्यांना तात्काळ बाहेर काढण्याची मागणी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष केदार काळे आणि उमेदवार सचिन पाटील यांनी केली.याच वेळी त्या बिल्डिंग मधून सेनेचा उमेदवार संखे हा बाहेर जात असल्याचे दिसून आल्यावर त्याला आणि त्याची बाजूला रस्त्यात उभी असलेली मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी करूनही पोलीस कारवाई करीत नसल्याने काँग्रेसच्या केदार काळे यांनी रस्त्यावर ठाण मांडून कारवाई ची मागणी केली. यावेळी घटनास्थळी आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सदर इमारतीची तपासणी केली. यावेळी अनेक फ्लॅट बंद अवस्थेत आढळले.शनिवारी रात्री शहरात मोठ्या प्रमाणात एमएच १२, एमएच १५, एमएच ०२ आदि नंबरच्या गाड्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या टाळ्या फिरून मतदारांना धमकावत असल्याच्या तक्र ारी नंतर पोलीस अधिकारी नाईक यांनी गोठणपूर, खाणपाडा, पिलेना नगर, मीठ कंपनी आदी ठिकाणी गस्त घातली, यावेळी आनंदआश्रम शाळे जवळ बाहेरून आलेल्या १० ते १५ जणांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना पळवून लावले.टेम्भोडे रोडवर फिरत असलेल्या जिल्या बाहेरील एका कारचा पाठलाग करून त्याची तपासणी केली असता त्यात लाकडी दांडूके आढळून आल्यावर पोलिसांनी चोप देत त्यांना पिटाळून लावले.आचारसंहितेला दिली तिलांजलीशनिवारी जाहीर प्रचार संध्याकाळी बंद झाल्यानंतर आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधीना मतदान क्षेत्रा बाहेर काढणे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांचे काम आहे. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जात या लोकप्रतिनिधींनी १० दिवसांपासून पालघरमध्येच ठाण मांडले होते.शनिवारी रात्री एक सत्ताधारी आमदार विजया बँकेच्या वर असलेल्या एका इमारतीमध्ये उमेदवाराला सोबत घेऊन मतदारांना प्रलोभने दाखवीत असल्याने आम्ही त्यांना रोखण्यासाठी जात असताना पोलिसांनी आम्हाला रोखले. रविवारी मतदानाच्या दिवशी भाजपाचे राज्यमंत्री मतदान क्षेत्रात बिनधास्त फिरत असताना त्यांना रोखण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नसल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक