शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

मेस्मा प्रकरणी गोऱ्हेंची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 2:56 AM

मतदारांनी शिवसेनेला आधार द्यावा : पोटनिवडणूकीत वनगा परिवाराचे आवाहन

पालघर : भाजपा सरकारची संवेदनशीलता मृत्युपंथाला लागली आहे. त्यामुळेच भूमीपुत्रांच्या अधिकारांवर सरकार हल्ला करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सूतोवाच शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा, उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा, वर्षा वनगा तसेच डहाणू महिला तालुकासंघटक सुलभा गडग उपस्थित होत्या.अंगणवाडी सेविका या विकासाच्या पाया आहे. परंतु या सेविकांना वेळेवर पगार नाही, कमी पगार हे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार असंघिटत कामगारांना मेस्मा लावण्याची तयारी केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मेस्मा कायदा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडले असे ही आ. गोºहे म्हणाल्या.जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून आदिवासी विकास विभागाच्या योजनाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने मी आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सवरा यांना अनेक वेळा फोन केला होता. यापूर्वी बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित हे सर्व वाल्याचे वाल्मिकी झाल्याचा आरोप ही त्यांनी केला.आ. गोºहे यांनी पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन व महामार्ग सारखे स्थानिकांना उध्वस्त करणारे प्रकल्प आणले जात असतील आणि अशा प्रकल्पांना स्थनिकांचा विरोध आहे म्हणून शिवसेना सदैव स्थानिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पालघर जिल्ह्यात मराठी जनता मोठ्या प्रमाणात राहते. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिल्ह्यात प्रचारासाठी आले तरी त्यांना कोणी ओळखत नाही. जिल्ह्यात मराठी माणसांवर भाजपचा विश्वास नाही. योगी तसेच तिवारी सारखे नेते पालघरमध्ये अमराठी लोकांची मते खेचण्याकरीता आणले जात आहेत असे त्या म्हणाल्या.भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियातील वारसांना उमेदवारी जाहीर केली असती तर शिवसेनेने कधीच दुसरा उमेदवार दिला नसता कारण यापूर्वी शिवसेनेने कायम भावना व प्रघात जपले आहेत. याची अनेक उदाहरणे आ. गोºहे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.आम्हाला तिकीट नको होते, आम्हाला गरज होती सांत्वनाचीज्यांनी आपल्या आयुष्याची ३५ वर्ष घालविली असे माझे सासरे दिवंगत चिंतामण वनगा याच्या निधना नंतर ३ महिने भाजपचा एकही मोठी व्यक्ती आम्हाला भेटायला आले नाहीत. अशी तक्रार त्यांची सून वर्षा वनगा यांनी केली. आम्हाला तिकीट नको आम्हाला गरज होती धीर आणि सांत्वनाची, मात्र असे काही घडलेच नाही असे म्हणून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेच्या नेत्यांनी कोणतीही अट न ठेवता मातोश्रीवर नेले व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घरातील व्यक्ती प्रमाणे वागणूक देऊन आधार दिला असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018