शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काळाचा घाला! प्रशिक्षणासाठी अहमदाबादला जाणाऱ्या सुवर्णपदक विजेत्या क्रीडा अधिकाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:57 IST

संभाजी पाटील हे सोमवारी सकाळी पुण्याहून खासगी कारने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी जात होते.

हितेन नाईक 

पालघर: क्रीडा क्षेत्रातील एक चमकता तारा निखळला आहे. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे क्रीडा अधिकारी (गट-ब) म्हणून कार्यरत असलेले सुवर्णपदक विजेते संभाजी शिवाजी झनझन पाटील (वय २६) यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. प्रशिक्षणासाठी गुजरातला जात असताना मनोर जवळील दुर्वेस येथे त्यांच्या कारला अपघात झाला. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

उभा ट्रक ठरला 'काळ'; महामार्गावरील दुर्लक्ष जीवावर बेतले

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी पाटील हे सोमवारी सकाळी पुण्याहून खासगी कारने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावच्या हद्दीत आली. यावेळी महामार्गावर डाव्या बाजूला सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता एक ट्रक उभा करण्यात आला होता. वेगवान कार या उभ्या ट्रकवर पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि संभाजी यांचा जागीच प्राण गेला.

यशोशिखर गाठणारा तरुण अधिकारी

छत्रपती संभाजीनगर येथील पारिजात नगर सिडको कॉलनीचे रहिवासी असलेले संभाजी पाटील हे उच्चशिक्षित आणि अत्यंत कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी नेमबाजीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले होते:

२०१८: ५३ व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत (२५ मीटर पिस्तूल सांघिक) सुवर्णपदक.

२०१९: ५४ व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत वैयक्तिक २५ मीटर शूटिंगमध्ये सुवर्णपदक.

२०२०: मध्य रेल्वे आयोजित चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक. अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती.

महामार्गाचा आणखी एक बळी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उभ्या राहणाऱ्या जड वाहनांमुळे अपघातांची मालिका थांबताना दिसत नाहीये. महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने उभी केलेली वाहने आणि नियोजनाच्या अभावामुळे आतापर्यंत शेकडो निरपराध प्रवाशांचे बळी गेले आहेत. संभाजी पाटील यांच्या रूपाने एका होतकरू आणि सुवर्णपदक विजेत्या तरुणाचा बळी गेल्याने महामार्ग प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

संभाजी यांचे वडील छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अग्निशमन अधिकारी तथा अतिक्रमण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. मुलाच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि खेळाडू वृत्तीचा अधिकारी गमावल्याची भावना बालेवाडी क्रीडा संकुलातील त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold medalist sports officer dies in tragic accident on highway.

Web Summary : Sambhaji Patil, a gold medalist sports officer, died in a highway accident near Manor while traveling to Ahmedabad for training. A stationary truck caused the fatal crash, sparking outrage over highway safety negligence. Patil's death is a significant loss to the sports community.
टॅग्स :Accidentअपघातpalgharपालघर