आई ओरडल्याने वसईत मुलीनं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:19 IST2025-04-12T07:19:28+5:302025-04-12T07:19:28+5:30
Vasai Crime News: वसईच्या बेलचीपाडा येथील आदर्श नगर सोसायटीत राहणाऱ्या इच्छा राजभर (१६) या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली

आई ओरडल्याने वसईत मुलीनं संपवलं जीवन
नालासोपारा - वसईच्या बेलचीपाडा येथील आदर्श नगर सोसायटीत राहणाऱ्या इच्छा राजभर (१६) या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. गुरुवारी ती घरी तांदळासोबत साखर खात होती. त्यामुळे तिची आई तिला ओरडली. त्यानंतर तिची आई पाणी भरण्यासाठी गेल्यावर मुलीने रागाच्या भरात छताच्या लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला. वालीव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.