सोमवारी मुख्यमंत्र्यांची विरारमध्ये जाहीर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:20 IST2019-04-20T23:20:06+5:302019-04-20T23:20:25+5:30
पालघर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार पूर्वेस मनवेलपाडा, तलाव येथे जाहीर सभा संपन्न होत आहे.

सोमवारी मुख्यमंत्र्यांची विरारमध्ये जाहीर सभा
वसई : पालघर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार पूर्वेस मनवेलपाडा, तलाव येथे जाहीर सभा संपन्न होत आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघ (अ.ज) निवडणूक -२०१९ करिता राज्यातील भाजप, शिवसेना आर.पी.आय, रासप, श्रमजीवी संघटना व जन आंदोलन समिती आणि आगरी सेना यांच्या सहकार्याने महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार दि.२२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता विरार पूर्व मनवेलपाडा येथे जाहीर सभा होत असून या विराट सभेसाठी शिवसेना- भाजप सहित महायुतीतील सर्व पक्ष, संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा यशस्वी करण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, विरारमध्ये आम. ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात अशा स्वरूपाची विराट जाहीर सभा ती ही दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: घेणार असल्याने सेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जलोषाचे वातावरण पसरले आहे.