शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जिलेटिनचे दोन टेम्पो पकडले, जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 00:01 IST

पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर यूनिटने जिलेटिन व इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरने भरलेले दोन टेम्पो अहमदाबाद -मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरुन बोईसरकडे येणाऱ्या चिल्हार फाट्यावर शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले

बोईसर : पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर यूनिटने जिलेटिन व इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरने भरलेले दोन टेम्पो अहमदाबाद -मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरुन बोईसरकडे येणाऱ्या चिल्हार फाट्यावर शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले असून आरोपींती दिवसभर कसून चौकशी सुरू होती.स्थानिक गुन्हे शाखा बोईसर यूनिटचे ए.एस.आय. भरत पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी व देवेंद्र पाटील गस्त करीत असताना चिल्हार फाटा येथे या दोन टेम्पोमध्ये चौदाशे नग इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर सापडले असून ही स्फोटके गुजरातमधील परवानाधारक हिरालाल जैन यांनी नागझरी येथील दगड खाणी करीता पाठविला असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांचेकडून कायदेशीर बाबी संदर्भात पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.नागझरी जवळील सूर्या नदीत मासे मारण्यासाठी गणेश वनगा हा आदिवासी तरु ण जिलेटिन या स्फोटकांचा वापर करीत असतानाच त्याच्या हातात स्फोट होऊन त्यात त्याचा मृत्यु झाला होता. तर विरारच्या सायवन आणि चांदीप बंदरावरील वाळू व्यावसायिकाकडे मोठ्या प्रमाणात जिलेटिन व डेटोनेटर ही स्फोटके अनधिकृत रित्या सापडल्याची घटना ताजी आहे. त्यातच शुक्रवारी मनोर पोलीस ठाणेच्या हद्दीतील चिल्हार फाट्यावर स्पोटके ताब्यात घेण्यात आली आहे त बोईसर पुर्वेकडील नागझरी,लालोंडे, निहे, किराट, गुंदले या भागात खदानी मध्ये जिलेटिनचा वापर होत असून नदीत मासे मारण्यासाठी बेकायदेशीर सुरू असलेल्या स्फोटकाचा वापर या घटनेमुळे धोकादायक असे जिलेटीन स्फोटक कोणालाही सहज उपलब्ध होऊ शक तात हे उघड झाले आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले स्फोटक हे कोणत्या खदानींत पुरवली जाणार होती, त्यांच्या जवळ परवाना आहे का या दृष्टिकोनातून तपास होण गरजेचे आहे. मनोर भागातही अशा खदानी असल्याने चौकशी होणार आहे.>लोकमत इफेक्टमासेमारी करण्यासाठी जिलेटीन कुठून आले त्याची सखोल चोकशी व्हावी अशी बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच पालघर पोलीस अधीक्षकांनी दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्या अनुषंगाने आजची करवाई करण्यात आली> स्फोटके आणण्या संदर्भात कायदेशीर परवानगी नसेल तर त्याबाबत खात्री करून कारवाई केली जाईल.- सिध्दवा जायबाये, सहाय्यक पोलीस निरीक्षक,मनोर पोलीस ठाणे