पीडित भुयाळ कुटुंबाला चार लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:25 IST2019-02-09T02:25:03+5:302019-02-09T02:25:42+5:30
डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी हळदपाड्यातील पिडित भुयाळ कुटुंबाला शुक्रवारी पालघरमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधुन ४ लाखांचा धनादेश देण्यात आला.

पीडित भुयाळ कुटुंबाला चार लाखांची मदत
डहाणू : तालुक्यातील धुंदलवाडी हळदपाड्यातील पिडित भुयाळ कुटुंबाला शुक्रवारी पालघरमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधुन ४ लाखांचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पिडित कुटुंबाची आस्थेने चौकशी केली.
गेल्या शुक्रवारी आलेल्या भूकंपाच धक्क्यामुळे घाबरु न घराकडे धावत असतांना वैभवी रमेश भुयाळ (२) या मुलीचा मृत्यू झाला होता. ‘‘भूकंप’’ या नैसिर्गक आपत्तीच्या पाशर््वभूमीवर उप सचिव महाराष्ट्र शासन यांनी विशेष बाब म्हणून मदत जाहीर केली आहे. शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या दरानुसार मुलीच्य वारसांना मदत देण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे उप सचिव महाराष्ट्र शासन यांनी अलघर जिल्हाधिकारी यांना निर्गिमत केलेल्या पत्रात कळवले होते. तिचे मृत्यू प्रकरण निकषात बसत नसल्याने तिला नुकसानभरपाई नाकारण्यात येत असल्याबाबत लोकमतने वृत्त प्रसारित करून मुख्यमंत्री फंडातून मदत करण्याच्या लोकमतच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला.