शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडावी लागते नदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 11:10 IST

पुलाचा प्रस्ताव प्रलंबित, तलासरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना

सुरेश काटेलोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : आदिवासी समाजाने शिकले पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे,  यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही आदिवासी गावपाड्यात ना चांगले रस्ते ना शाळा, ना नदीवर पूल अशी तलासरी तालुक्यात स्थिती आहे. आदिवासी समाजाच्या मुलांना कच्चा रस्ता आणि नदीच्या पाण्यातून शिक्षणासाठी जावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र तलासरीतील सूत्रकार काटीलपाडा, वेडगपाडा येथील विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे. या पाड्यातील मुलांना शाळेत येण्यासाठी गावातून वाहत जाणारी काळू नदी जीव मुठीत घेऊन पार करावी लागते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास शाळेला दांडी मारावी लागते अन्यथा चार किमीचा फेरा मारावा लागतो. 

आदिवासी भागासाठी रस्ते, पूल यासाठीही मोठा निधी खर्च होतो, पण  आदिवासी समाजासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च  केल्याच्या राजकारण्यांच्या वल्गना त्यांच्या फायद्यासाठी आहेत का? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. तलासरीतील सूत्रकार काटीलपाडा, वेडगपाडा येथील  शेकडो मुले शिक्षणासाठी सूत्रकार शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा तसेच सुरतीपाडा येथील खासगी शाळेत येतात. सूत्रकार पुरातन शंकर मंदिर  येथे नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे, पण बंधाऱ्यावरून  जाताना बंधारा निसरडा असल्याने पाय घसरून पाण्यात पडण्याची भीती आहे. यामुळे शालेय मुले, गावातील शेतकरी  पाण्याचा उतार कमी असलेल्या ठिकाणावरून नदी ओलांडतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नदीला अचानक पूरही येतो. अशा वेळी मुले नदी ओलांडत असताना नदीला पूर आल्याने वाहून जाण्याची भीती आहे.

काळू नदीवर पूल बांधावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.  दहा वर्षांपूर्वी नदीवर पूल मंजूर झाला होता. निधी न मिळाल्याने पुलाचे काम रखडले पूल  व रस्ता बांधण्यास एक कोटी निधीची गरज आहे. तलासरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या ठिकाणी पुलाचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. पण त्यास अजून मंजुरी न मिळाल्याने मुलांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास नदीपात्रातून सुरू आहे. 

काळू नदीवर शंकर मंदिराजवळ पुलाचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे - सार्वजनिक बांधकाम खाते, तलासरीपूल नसल्याने विद्यार्थी,  गावकऱ्यांनाही नदी पात्रातून ये-जा करावी लागते. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.- रत्ना शिडवा रयात, पालक

नदीवर पूल मंजूर होता, पण तो बनविण्यात आलेला नाही. पूल नसल्याने विद्यार्थ्यांना चार किमीचा प्रवास करावा लागतो. - माधुरी धर्मा गोवारी, सरपंच, सूत्रकार 

टॅग्स :palgharपालघरSchoolशाळाEducationशिक्षण