शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांच्या भरपाईचा फेरविचार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:03 IST

मच्छीमारांमध्ये नाराजी : नवीन शासन निर्णय काढण्याची मागणी

हितेन नाईक 

पालघर : केंद्र आणि राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाºया आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित निकष हे मच्छीमारांवर अन्यायकारक असल्याने हे शासन निर्णय रद्द करून मच्छीमारांच्या संकटसमयी त्यांना योग्य भरपाई मिळेल अशा तरतुदींनी युक्त असे नवीन शासन निर्णय काढावेत अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित होणाºया व्यक्तींना मदत देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासन यांनी संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाने ८ एप्रिल २०१५ च्या पत्राद्वारे २०१५ ते २०२० या कालावधीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित निकष आणि दर निश्चित केले आहेत. हे दर १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने १ एप्रिल २०१५ पासून राज्य शासनाने निर्णय लागू केला आहे. या निर्णयाप्रमाणे नैसिर्गक आपद्ग्रस्त व्यक्तीचा नदीत वाहत जाऊन मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ४ लाखांची मदत दिली जाते. तर मासेमारीला गेलेला मच्छीमार समुद्रात पडून बुडून मृत्यू पावल्यास त्याला केवळ २ लाख रक्कम मिळते. हा मच्छीमारांवर अन्याय असल्याचे सांगत मच्छीमार कुंदन दवणे यांनी खंत व्यक्त केली. तसेच एखादा अवयव किंवा डोळे निकामी झाल्यास, ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार १०० रु पये तर ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास २ लाख भरपाई मिळते. मात्र मासेमारीला गेलेल्या मच्छीमाराना अशी दुखापत झाल्यास कुठलीही भरपाई मिळत नाही.शेतकऱ्यांची दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी जनावरे किंवा मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी जनावरे दगावल्यास त्या बदल्यात दुधाळ म्हैस, गाय, उंट या जनावरांना ३० हजार रु पये मेंढी, बकरी, डुक्कर यांना तीन हजार रु पये, तरु ण घोडा, बैल यांना २५ हजार तर वासरू, शिंगरू, खेचर यांना प्रत्येकी १६ हजार रु पये मदत दिली जाते. परंतु मासेमारी करताना बोट अपघातग्रस्त झाल्यास ४ हजार १०० तर पूर्णत: नष्ट झाल्यास अवघे ९ हजार ६०० रु पये दिले जातात. एका बोटीत कमीत कमी दीड ते २ लाखांची जाळी असतात. ती पूर्णत: नष्ट झाल्यास २ हजार ६०० देण्याची तरतूद आहे. शेतकरी आणि मच्छीमारांना देण्यात येणाºया नुकसानभरपाईमध्ये मोठी तफावत आहे.शेतकºयांना ज्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते तशी मच्छीमारांनाही मिळायला हवी. मच्छीमारी व्यवसाय त्यांची औजारे, मत्स्य उत्पादन याबाबत अधिकारी वर्गाला पुरेसे ज्ञान नसल्याने चुकीची माहिती पुरवली जाते. परिणामी, मच्छीमारांना भरपाई मिळण्यात अन्याय केला जातो.- सुभाष तामोरे, सागरी सल्लागार समिती, माजी सदस्य.मच्छीमारांच्या हाती काही ठोस मिळेल असे या शासन निर्णयात काही नाही. टेबलावर बसून हा शासन निर्णय बनविण्यात आला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तत्काळ रद्द करून नव्याने बनवणाºया शासन निर्णयात मच्छीमारांना योग्य मोबदला मिळण्याचे प्रयोजन करावे.- दामोदर तांडेल,अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीज्या अधिकाºयांच्या परिस्थितीनुरूप पाहणी अहवालानुसार हा निर्णय बनविला आहे. तो पूर्णत: सदोष असून मच्छीमार आणि त्यांच्या व्यवसायाच्या नुकसानभरपाईबाबत फेरविचार व्हावा अशी मागणी आता मच्छीमारांमधून होते आहे. 

टॅग्स :fishermanमच्छीमारRainपाऊस