डहाणू इराणी रोड लगतच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 11:49 IST2019-08-25T11:49:00+5:302019-08-25T11:49:37+5:30
इराणी रोड मार्गालगत अभ्यंकर कंपाउंड या इमारतीत असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम गाळ्याला रविवार, सकाळी आठच्या सुमारास आग लागली.

डहाणू इराणी रोड लगतच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमला आग
डहाणू/बोर्डी - डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला नगर परिषद हद्दीतील इराणी रोड मार्गालगत अभ्यंकर कंपाउंड या इमारतीत असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम गाळ्याला रविवार, सकाळी आठच्या सुमारास आग लागली. यामध्ये एटीएम मशीनसह, तेथील फर्निचर जळून खाक झाले. डहाणू नगर परिषद आणि डहाणू थर्मल पॉवर कंपनीच्या अग्नीशमन दलाने आटोक्यात आणली.
शहरातील मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला असून रविवारची सुट्टी आणि सकाळची वेळ असल्याने जीवितहानी टळली. आगीचे कारण आणि झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती डहाणू पोलीसांकडून देण्यात आली.