आग लागल्याने विक्रमगडमध्ये दुकान जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 03:55 IST2017-12-16T03:55:07+5:302017-12-16T03:55:13+5:30

शहरामधील पाटिलपाडा येथील अतुल पाटील यांच्या इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकानाला रात्री शार्ट सिर्किटमुळे लागलेल्या अगीत त्यांचे दूकान जळून खाक झाले आहे. घटनेची वर्दी देऊनही दुपारपर्यंत पंचनामा झाला नव्हता. त्यांनी व्यवसायासाठी बॅँकेतून व सावकारी कर्ज काढले होते. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

Fire broke out in shop in Vikramgad due to fire | आग लागल्याने विक्रमगडमध्ये दुकान जळून खाक

आग लागल्याने विक्रमगडमध्ये दुकान जळून खाक

विक्रमगड : शहरामधील पाटिलपाडा येथील अतुल पाटील यांच्या इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकानाला रात्री शार्ट सिर्किटमुळे लागलेल्या अगीत त्यांचे दूकान जळून खाक झाले आहे. घटनेची वर्दी देऊनही दुपारपर्यंत पंचनामा झाला नव्हता. त्यांनी व्यवसायासाठी बॅँकेतून व सावकारी कर्ज काढले होते. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या आगीमध्ये दुकानदाराने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटिल हे बेरोजगार असल्याने त्यांनी बँकेतून आणि सावकारी कर्ज घेऊन इलेक्ट्रिकल व हार्डवेअरचे दुकान सुरु केले होते. मात्र गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत त्याचे दूकान पूर्णपणे जळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसरकीटने लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
मात्र विक्र मगड तालुक्यात आग विझवण्याची कोणतीही साधन वा यंत्रणा आस्तीत्वात नसल्याने ही आग आटोक्यात अणण्यास जास्त विलंब झाला परंतु सदर घटनेबाबत नगरपंचायतीला कळविल्यानंतर ती विझवण्यात आली.

Web Title: Fire broke out in shop in Vikramgad due to fire

टॅग्स :fireआग