नालासोपारा स्टेशन जवळील जाधव मार्केटला भीषण आग, ५ दुकाने जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 20:09 IST2022-10-29T20:08:34+5:302022-10-29T20:09:30+5:30
जाधव मार्केटमध्ये कपडे, मोबाईल व इतर विक्रेते विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्याची अनेक दुकाने आहेत. शनिवारी संध्याकाळी अचानकपणे या मार्केटला आग लागल्याने खळबळ उडाली.

नालासोपारा स्टेशन जवळील जाधव मार्केटला भीषण आग, ५ दुकाने जळून खाक
मंगेश कराळे
नालासोपारा - पूर्वेकडील नालासोपारा रेल्वे स्टेशन जवळील असलेल्या जाधव मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे जाधव मार्केट पूर्वेकडील तिकीट काउंटरला लागूनच आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या लागलेल्या आगीत मार्केटमधील ५ दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ती जळून खाक झाली आहे. आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरून आगीच्या धूर दिसत होते.
जाधव मार्केटमध्ये कपडे, मोबाईल व इतर विक्रेते विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्याची अनेक दुकाने आहेत. शनिवारी संध्याकाळी अचानकपणे या मार्केटला आग लागल्याने खळबळ उडाली. या घटनेची नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दोन गाड्यांसह दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. पोलिसही घटनास्थळी पोहचून गर्दीला बाजूला करत आहे. मागील वर्षी याच मार्केटला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती.