शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

भराव माफियांनी डोके काढले वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 5:36 AM

संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होत आहे ऱ्हास

मीरा रोड : मातीचा बेकायदा भराव रोखण्यात पालिकेला अपयश आले असताना आता पावसाळा संपल्यानंतर मीरा भार्इंदर मध्ये मातीचा भराव करणाऱ्या माफियांनी डोके वर काढले असून शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा मातीचा भराव सुरू झाला आहे. मुंबईतून येणाºया दगड-मातीचे प्रमाण मोठे आहे. नैसर्गिक नाल्यांसह सर्वात जास्त फटका नाविकास क्षेत्र, सीआरझेड , कांदळवन व पाणथळ भागाला बसत असल्याने पर्यावरणाचा मोठा ºहास होत आहे. तर सर्रास चालणाºया या बेकायदा भरावांकडे महापालिका, महसूल व पोलिसांसह लोकप्रतिनिधी डोळेझाक करतआहे.

मीरा- भार्इंदरमध्ये पूर्वी भरावासाठी महापालिकेच्या संगनतमाने कचºयाचा उपयोग करून घेण्यात येत होता. पण पालिका अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाल्याने कचरा टाकणे बंद झाले. दरम्यान मीरा- भार्इंदरमधून बांधकाम प्रकल्प, नालेसफाई, भूमिगत गटारासह शहरात होणारे बांधकाम डेबिजचा वापर भरावासाठी केला जाऊ लागला. मुंबईतून विविध बांधकाम प्रकल्पातून दगड-माती निघू लागल्याने मीरा भार्इंदर व वसई विरार तर मुंबईतील माती टाकण्याची डम्पिंग ग्राऊंड झाली आहेत.आधी भराव करण्यासाठी खूप खर्च येत असे. पण आता मात्र भराव टाकण्यासाठी पैसे मिळू लागल्याने नागरिकांना फुकटचा भराव करून मिळतो. यामुळे माती माफिया बोकाळले आहेत. दिवस - रात्र शहरात लहान मोठी वाहने डेबिज, माती वाहून नेत सर्रास फिरत असताना त्यांना महापालिका, पोलीस वा महसूल विभागापैकी कोणी अडवताना दिसत नाहीत. संबंधित सरकारी यंत्रणा केवळ एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. पालिकेची माती भराव नियंत्रण पथकेही निव्वळ दिखाऊ ठरली आहेत.बेकायदा भराव खाजगी व सरकारी जमिनीतही केला जात असून भूखंड तयार करण्यापासून झोपड्या, चाळी, तबेले , गोदाम आदी विविध बांधकामे उभी राहत आहेत. बेकायदा भरावामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होत असतानाही यंत्राणा दुर्लक्ष करत आहेत.चेणे, काजूपाडा, वरसावे, घोडबंदर, माशाचा पाडा व परिसरात मोठ्या प्रमाणात भराव केला जात आहे. नैसर्गिक चेणे नदी व ओढ्यांमध्ये भराव करून प्रवाहाचे मार्ग अरुंद केले आहेत.मीरा रोडच्या कनकिया, हाटकेश, इंद्रलोक तर भार्इंदरच्या नवघर, आरएनपी पार्कपर्यंत तसेच पश्चिमेला रेल्वे मार्गापासून राधास्वामी सत्संग ते थेट मुर्धा, राई, मोर्वा , डोंगरी, उत्तनपर्यंत व पालिका मुख्यालया मागील परिसरात डेब्रिज, दगड-माती भराव करणाºया माफियांनी डोके वर काढले आहे. यामुळे पुन्हा यंत्रणांना कारवाई कराव लागणार आहे.मातीचा भराव नियंत्रण पथकासह अधिकाºयांनाही कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाहने जप्त करून गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे. बेकायदा भराव चालू देणार नाही. पोलीस व महसुल विभागाशी समन्वय ठेऊन कारवाई करु.- बालाजी खतगावकर, आयुक्तनियमांचे उल्लंघन करून माती - डेबिजचा भराव करणाºया वाहनांवर कारवाईसाठी पोलीस आवश्यक खबरदारी घेतील. तक्रार आल्यास निश्चितच कारवाई केली जाईल.- शांताराम वळवी,उपअधीक्षक, मीरा रोडमातीभराव माफियांना शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनासह विकासक, भूमफियांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे खुले आम भराव करणारी वाहने फिरत असताना त्यावर कारवाई होत नाही. - अनु पाटील,महिला संघटक, मनसे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरVasai Virarवसई विरार