वसईतील बेडशीट बनवणारी कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचा मुद्देमाल झाला खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:14 IST2019-10-29T23:14:25+5:302019-10-29T23:14:45+5:30

आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली होती.

Fiery fire to a company making bedsheets in Vasai; Millions of rupees have been settled | वसईतील बेडशीट बनवणारी कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचा मुद्देमाल झाला खाक

वसईतील बेडशीट बनवणारी कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचा मुद्देमाल झाला खाक

नालासोपारा : वसई पूर्वेकडील वालीव फाटा येथील खूषपल या बेडशीट बनवणाऱ्या कंपनीत मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या जवानांना तब्बल तीन तासांनी आग विझवण्यात यश आले.

यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बेडशीट बनविण्यासाठीचा माल १७ ते ३२ दरम्यानच्या गाळ्यांमध्ये भरण्यात आला होता. त्यालाच मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली होती.
आग विझवण्यासाठी वसई - विरार मनपा अग्निशमक दलाचे ३० कर्मचारी, २ अधिकारी यांनी फायर ब्रिगेडच्या ४ गाड्या आणि पाण्याच्या ३ टँकरसह आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यावेळी वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.

Web Title: Fiery fire to a company making bedsheets in Vasai; Millions of rupees have been settled

टॅग्स :fireआग