शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

डीजींच्या हस्ते मिलन तरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 2:49 AM

सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली बोट बुडाल्यानंतर संकटात सापडलेल्या ११ मच्छीमार बांधवाची सुखरूप सुटका करणाऱ्या सातपाटी येथील मिलन शंकर तरे याचा ‘नॅशनल महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू पुरस्कार’ डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे देण्यात आला.

पालघर - सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली बोट बुडाल्यानंतर संकटात सापडलेल्या ११ मच्छीमार बांधवाची सुखरूप सुटका करणाऱ्या सातपाटी येथील मिलन शंकर तरे याचा ‘नॅशनल महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू पुरस्कार’ डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे देण्यात आला.सातपाटी बंदरातून ९ मे रोजी खोल समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘शिवनेरी’ बोटीला जोरदार लाटांचा तडाखा बसून बोट बुडाल्या नंतर त्यातील ११ खलाशी आणि तांडेल समुद्रात फेकले गेले होते. या बोटीला महाकाय लाटेचा तडाखा बसल्या नंतर तांडेल बंटी धनु यांनी आपल्या वायरलेस सेट वरून परिसरात मासेमारी करणाºया मच्छीमार बांधवांना मदतीची विनंती केली होती. यावेळी मिलन तरे यांनी थर्माकोल बॉक्सच्या साहाय्याने पाण्यावर तरंगत असलेल्या ११ मच्छीमाराना आपल्या बोटीत घेत त्यांचे प्राण वाचविले होते. या प्रकरणाची दखल कोस्ट गार्डने घेत त्यांचा सत्कार कोस्टगार्ड चे अधिकारी चाफेकर यांनी करून पुरस्काराची घोषणा केली होती.५ जुलै रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये श्कक ठटरअफइ च्या बैठकीत महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू बोर्डाचे डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी एसआर शिपिंगच्यावतीने तरे यांना रोख रक्कम आणि सन्मान पत्र देण्यात आले. यावेळी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर विभागाचे कोस्ट गार्डचे अधिकारी, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ ह्या राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त उपस्थित असल्याचे एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. देशातून विशेष कार्य करणाºया विविध विभागातील अधिकाºयांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात मिलन तरे यांचा समावेश होता.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या