समुद्रात मच्छिमार बोटीवर दुसऱ्या बोटीचा जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 19:55 IST2020-12-28T19:55:02+5:302020-12-28T19:55:52+5:30
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो व संजय कोळी यांनी मत्स्यआयुक्त व मत्स्यमंत्री अस्लम शेख यांना सदर घटनेची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे कळविले होते

समुद्रात मच्छिमार बोटीवर दुसऱ्या बोटीचा जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
मुंबई - वसईतील बोट मालक नितीन बुधुल यांच्या विश्वराजा नावाच्या मच्छिमार बोटीवर दमणमधील सुमारे २५ ते ३० बोटींनी २६ डिसेंबर रोजी एकत्र हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन मच्छिमार जखमी झाले असून बोटीचे अंदाजे नुकसान ५ ते ६ लाख झाल्याचे बुधूल यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच वसई मच्छिमार संस्थेचे चेअरमन श्री. संजय कोळी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देऊन ०० नंबर खाली गुन्हा जीवे मारण्याच्या उद्देशाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो व संजय कोळी यांनी मत्स्यआयुक्त व मत्स्यमंत्री अस्लम शेख यांना सदर घटनेची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे कळविले होते. त्यानुसार, एलोगेट पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या जबाबावरुन कलम 307, 324, 341, 143,144 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पर्ससीन बोटधारकांकडून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने विश्वराजा बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, पुढील काही दिवस ही बोट काम करु शकणार नसल्याने या बोटीवरील मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासाठी, शासनाने या बोटीवरील मच्छिमारांना मदत देऊ करावी, अशी मागणीही मच्छिमार संघटनेने केली आहे.