शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

परतीच्या पावसाने पेंढ्यांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:51 PM

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

विक्रमगड : तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवते. शेतकरी, शेतमजूर हे गवत व त्याचबरोबर भातझोडपणी करून राहत असलेल्या पेंढ्यांची (पाओलीची) विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. विक्रमगड तालुका हा गवत-पेंढा खरेदी करण्याचे कोठार समजले जाते. या गवत पाओलीच्या वखारी तालुक्यात नोव्हेंबरअखेरीस काही भागात सुरू झाल्या असून त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र नाराज झाले आहेत. पाओलीला व गवताला योग्य भाव देण्याची मागणी शेतक-यांकडून केली जाऊ लागली आहे. या वर्षी उशिराने नोव्हेंबरशेवटी वखारी सुरू झाल्याने गवत पाओली खरेदीविक्रीला जोर आला असला, तरी तालुक्यात गवताला पाच हजार रुपये टन भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी गवत पाओली विकण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील वखारीत आणतात. गेल्या वर्षी तालुक्यात गवत व पाओली खरेदीच्या २५ वखारी सुरू होत्या. यावर्षी त्याची संख्या कमी होऊन सातआठ वखारी सुरू आहेत. या वखारीतील गवताला योग्य भाव नसल्याने वखारीमालक गवत वखारीत साठवणूक करून ठेवत असतात. पावसाळ्यात गवताच्या गठड्यांना मोठी मागणी व योग्य भाव असल्याने वखारीमालक दूध व्यवसाय करणाऱ्या तबेल्यांना विक्री करतात. यावर्षी पावसाळ्यादरम्यान वखारी बंद होत्या. त्यामुळे आम्हाला तोट्यात जावे लागले, असे वखारमालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पाओलीला एकाधिकारी खरेदी केली होती, परंतु त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहे. आता खाजगी व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत.

इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी भावविक्रमगडमध्ये सद्य:स्थितीत व्यापारी शेतकऱ्यांना पाओलीला २२०० ते २५०० रुपये टन भाव देत असून गेल्या वर्षी पाओलीला टनाला ३५०० ते ४००० हजार भाव मिळत होता. या वर्षी पाऊस लांबल्याने व परतीच्या पावसाने पाओली कुजल्याने भाव घसरला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. इतर तालुक्यांतील काही भागात पाओलीला टनाला ३००० ते ३२०० रुपये टन भाव दिला जात आहे. मात्र, विक्रमगड तालुक्यात टनाला २२०० ते २५०० रुपये भाव देत असल्याने तालुक्यातील शेतकरी नाराज झाले आहेत.

वाढती महागाई तसेच शेती अवजारे, खते, बियाणे यांचे भाव, मजुरांची मजुरी वाढली आहे. भातालाही योग्य भाव नसल्याने पाओलीला साधारण ४००० रु. टन भाव व्यापारीवर्गाने द्यावा. -ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड

यावर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबला. त्यामुळे शेतीचे नुकसान केले. पाओली खरेदी करणा-या व्यापारीवर्गाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पाओलीला भाव वाढवून द्यावा. -प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Farmerशेतकरी