शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

भात खरेदी केंद्राअभावी शेतकरी त्रस्त; कमी दरात व्यापाऱ्यांना भात विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:05 IST

आर्थिककोंडीमुळे भूमिपुत्र हैराण

पारोळ : आधीच अस्मानी संकटाने पूर्ण कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारी छळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी वसईत अद्याप भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकरीवर्गाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मदतही तुटपुंज्या स्वरूपात जाहीर झाली आहे, मात्र तीही अद्याप शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाही. रब्बी पिकांच्या खर्चाचा मेळ भात पीक विकून शेतकरी बसवत असतो. पण वसईत भात खरेदी केंद्र उपलब्ध न झाल्याने व्यापाऱ्यांना कमी दरात भात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वसई तालुक्यातील शेतकरी पावसाळ्यात भाताचे एकमेव पीक घेतात. लहरी पावसामुळे कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. प्रत्यक्ष भाताचे उत्पादन, वाढलेले मजुरीचे दर आणि शासनाने जाहीर केलेली आधारभूत हमीभाव रक्कम यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भात कसण्यास शेतकऱ्यांना परवडत नाही.

भाताचे कोठार समजल्या जाणाºया वसई पूर्व भागात खासगी व्यापाºयांची चंगळ सुरू असून शेतकºयांच्या गरजेचा फायदा घेऊन हे व्यापारी कवडीमोलाने भात खरेदी करत आहेत. वसई तालुक्यात पहिले भात खरेदी केंद्र शिरवली येथील सेवा सोसायटीच्या गोदामात सुरू झाले. नंतर ते भिनार व मेढे येथे हलवले. या वर्षीही वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्रे मंजूर असताना अजूनही ती सुरू झाली नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे, तर शिरवली हे ठिकाण या केंद्रासाठी योग्य असल्याने या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना १२०० ते १३०० रु. क्विंटल दराने भात पीक खाजगी व्यापारी यांना विकावे लागत आहे, तर या वर्षी भात खरेदी केंद्राचा १७५० हमी भाव असून २०० रुपये महाराष्ट्र शासनाचा बोनस आहे. यामुळे वसईत भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.- रमेश घरत, अध्यक्ष, शिरवली सेवा सोसायटी

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार