कर्तबगार रेल्वे पोलिसांचा पालघरला झाला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:53 AM2019-02-05T02:53:48+5:302019-02-05T02:54:04+5:30

पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

 Farewell to the Railway Police of Palghar | कर्तबगार रेल्वे पोलिसांचा पालघरला झाला सत्कार

कर्तबगार रेल्वे पोलिसांचा पालघरला झाला सत्कार

Next

पालघर - पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला.
पालघर रेल्वे स्टेशन मध्ये लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल,रेल्वे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक प्रवासी ह्यांच्यात समन्वय रहावा ह्यासाठी पोनि. सोनावणे ह्यांनी 26 जानेवारी रोजी एका कार्यक्र माचे आयोजन केले होते. ह्यावेळी पोलिसांना सहकार्य करणारे स्टेशन अधीक्षक कोहली,रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अख्तर अली, डॉ. राजेंद्र चव्हाण, स्थानिक प्रवासी नयन पाटील,भारत भदाणे ह्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डहाणू पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असतांना तीन खुनांचा यशस्वी तपास करून आरोपीना जन्मठेपेची शिक्षा भोगायला लावणारे पोनि. उत्तम सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजात पालघरचा द्वितीय क्रमांक आणणारे महाडिक आणि रेल्वे अपघातात जखमी महिलेला तात्काळ मदत देणारे पोलीस गावडे, लोकल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेला मदत करणारे पोलीस गाडेकर, बंडगर, खोत, राहीज, चोरीचा तपास करून आरोपीस अटक करणारे पोलीस नाईक नागवेकर आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title:  Farewell to the Railway Police of Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.