जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या अटीवर कोलाला अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:13 AM2019-05-29T01:13:12+5:302019-05-29T01:13:15+5:30

वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे.

Extra water to the cola on the condition of setting up a water purification center | जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या अटीवर कोलाला अतिरिक्त पाणी

जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या अटीवर कोलाला अतिरिक्त पाणी

Next

- वसंत भोईर 

वाडा : संपूर्ण राज्यासह वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे. हे पाणी वाड्याच्या वैतरणा नदीतील सिद्धेश्वरी बंधाऱ्यावर नगरपंचायतीने अडवल्याने कंपनी प्रशासनाकडून अर्ज विनंत्या करून हे पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु नगरपंचायतीकडून कंपनीची विनंती अमान्य केल्याने कोकाकोला कंपनीचे उत्पादन गेल्या पाच दिवसांपासून बंद होते. काल अखेर नगरपंचायतीचे पदाधिकारी व कंपनी प्रशासन यांच्यात दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका होऊन त्या दरम्यान कंपनी प्रशासन अखेर नरमले आणि त्यांनी नगरपंचायतीची जलशुद्धीकरण केंद्र बसविण्याची मागणी मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने वाडा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गेल्या दोन-तीन दिवसांपासून रंगलेल्या उलट सुलट चर्चेला मंगळवारी अखेर पूर्णविराम मिळाला. पाटबंधारे विभागाने वैतरणा नदीतवर गांधरे येथे बांधलेला बंधारा कोरडा पडल्याने गेल्या पाच दिवसांपासून कोकाकोला कंपनीवर उत्पादन बंद करण्याची नामुश्की ओढवली होती. याची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अप्पर वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा तत्काळ सोडण्यात आला. परंतु दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने व नदीपात्र कोरडे असल्याने कंपनीच्या पाणीसाठ्यापर्यंत मुबलक पाणी पोहचू शकले नाही. याच नदीच्या मार्गात असलेल्या वाडा शहरासाठीचा सिद्धेश्वरी बंधारा पूर्णपणे भरल्याने कंपनीने नगरपंचायतीकडे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु वाडा शहरातील नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे वाडा नगरपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन कंपनीस सहकार्य करण्यास तयार नव्हते. गेले दोन ते तीन दिवस कंपनी प्रशासन व पदाधिकारी आणि नागरपंचायात प्रशासन यांच्यात अतिरिक्त पाणीसाठा सोडण्याच्या प्रश्नावर चर्चेचे गुºहाळ रंगले होते.
>अखेर पेचप्रसंगावर तोडगा निघाला
अखेर सोमवारी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे व कंपनी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, मुख्यधिकारी प्रबोधन मवाडे, पाणी समिती सभापती जागृती काळण, भाजपचे गटनेते मनिष देहेरकर, नगरसेवक संदीप पवार, शिवसेना गटनेते संदीप गणोरे तसेच बहुसंख्य नगरसेवक यांच्यात यशस्वी चर्चा होऊन वाडा शहरासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून देण्याचे कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर या वादाला पूर्णविराम मिळाला.
>कंपनी प्रशासनाकडून नगरपंचायतीकडे अतिरिक्त पाणी देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन कंपनीकडून नागरपंचायतीसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आज नगरपंचायतीकडून अतिरिक्त असलेले पाणी सोडण्यात आले.
- प्रबोधन मवाडे,
मुख्याधिकारी-नगरपंचायत वाडा

Web Title: Extra water to the cola on the condition of setting up a water purification center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.