शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रसुतीच्या असह्य कळा सोसत तिने केला डोलीतून चार किलोमीटरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:06 IST

मोखाड्याच्या आदिवासी पाड्यांत रस्ता नाही, ॲम्ब्युलन्सचा प्रतिसाद नाही, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष...

रवींद्र साळवे -

मोखाडा : राज्याची राजधानी मुंबई, हाकेच्या अंतरावर असणारे माेखाडा.  मात्र आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत  राहणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना माेखाड्यातल्या आदिवासींचे दु:ख  कसे समजणार? परिणामी पाड्यापासून रस्ता नसल्याने असह्य कळा सुरू असतानाही पाच महिन्यांच्या गरोदर महिलेला अखेर डोलीतून चार किलाेमीटर असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागल्याची संतापजनक घटना मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाड्यात घडली. यापूर्वीही अनेकवेळा गरोदर महिलांचे असे हाल झाल्याच्या बातम्या येऊनही प्रत्येक पाड्यापर्यंत साध्या रस्त्याची सोयही न केल्याने प्रशासनाची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष आदिवासींच्या जिवाशी कसे खेळते आहे, हे वास्तव पुन्हा समोर आले.

मोखाडा तालुक्यापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेल्या मुकुंदपाड्यातील दुर्गा मनोहर भोये या पाच महिन्याच्या गरोदर महिलेच्या पोटात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक असह्य वेदना सुरू झाल्या. मदत मिळावी म्हणून कुटुंबीयांनी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला. काहीच प्रतिसाद मिळत नव्हता, असे नातलग नरेश भोये यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

अखेर एका बांबूला कांबळ बांधून त्याचीच डोली करून तिला रुग्णालयात नेण्याचे ठरवले. तिन्हीसांजेच्यावेळी डोंगर-दऱ्यांतून पाऊलवाटेने चार किलोमीटर चालत त्यांनी आंब्याचा पाडा गाठला. तेथून तिला आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, पण तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथून तिला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. दोन दिवसांच्या उपचारानंतर तिची प्रकृती सुधारल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हा प्रश्न एकट्या दुर्गाचा नाही. अशा घटना वारंवार घडतात, असे स्थानिकांनी सांगितले.

कधीकधी रस्त्यातच रूग्ण दगावतो...आमच्या भागात रस्त्याची सोय नाही. रुग्णाला डोली करूनच आठ- आठ किलोमीटर अंतरावर उपचारासाठी न्यावे लागते. कधी कधी एखादा गंभीर रुग्ण रस्त्यातच प्राण सोडतो.  पावसाळ्यात परिस्थिती बिकट होते. तालुक्याशी संपर्क तुटून जातो. अशावेळी हताशपणे येईल त्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, असे स्थानिक आदिवासी गणपत भोये यांनी सांगितले.

नेते निवडणुकीपुरतेच १२८ आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाड्यावर सोयी-सुविधांचा अभाव आहे. पाणी नाही. जवळच्या अंतरावर आरोग्याची व्यवस्था नाही. रस्ताही नाही. निवडणुका आल्या की, मते मागण्यापुरते नेते येतात, असे गाऱ्हाणे पाड्यावरच्या लोकांनी मांडले.  

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल