आच्छाड तपासणी नाक्यावर डंपरची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 10:55 IST2021-06-12T10:53:38+5:302021-06-12T10:55:10+5:30
Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या आच्छाड पोलीस तपासणी नाक्यावर गुजरात बाजूकडून येणारी वाहने पोलिसांच्या तपासणीसाठी उभी असताना शुक्रवारी रात्री मागून भरधाव येणाऱ्या डंपरने या वाहनांना जोरदार धडक दिली.

आच्छाड तपासणी नाक्यावर डंपरची धडक
तलासरी - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या आच्छाड पोलीस तपासणी नाक्यावर गुजरात बाजूकडून येणारी वाहने पोलिसांच्या तपासणीसाठी उभी असताना शुक्रवारी रात्री मागून भरधाव येणाऱ्या डंपरने या वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत सात-आठ छोटी वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तलासरी पोलिसांनी डंपर चालकास ताब्यात घेतले आहे. गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.