वसईत दुष्काळी झळा, प्रथमच विहिरी कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:29 IST2019-05-14T00:29:49+5:302019-05-14T00:29:57+5:30
सूर्य आग ओकत असतांनाच वसईला दुष्काळी झळा बसू लागल्या असून प्रथमच काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

वसईत दुष्काळी झळा, प्रथमच विहिरी कोरड्या
पारोळ : सूर्य आग ओकत असतांनाच वसईला दुष्काळी झळा बसू लागल्या असून प्रथमच काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने नदी नालेही सुके पडले असल्याने काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तर भविष्यात पडण्याऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात शिरवली, पारोळ, माजीवली, देपिवली, उसगाव, शिवणसई, आडणे, इ. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ऐन लग्न सराईत ही टंचाई निर्माण झाल्याने यजमानांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दरवर्षी मेपर्यंत विहिरीत ४ ते ५ फूट पाणी असायचे. त्या विहिरीनीसुध्दा यावर्षी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने बोरवेल ही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शहरातून सुट्टीसाठी गावाकडे येणारी मंडळी पाणी टंचाईमुळे आली नाही तर जे आले तेही परतीच्या मार्गाला लागले आहेत तर आजोळीकडे येणाºया मुलांचीही संख्या पाणी नसल्यामुळे कमी झाली आहे तर ही परिस्थिती प्रथमच निर्माण झाली आहे.
माझी विहीर २५ वर्षात प्रथमच कोरडी पडली असून या विहिरीच्या काही अंतरावर पारोळ बोअरवेलमधून विक्र ीसाठी पाणी उपसा होत असल्याने या भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
- रमेश घरत,
खाजगी विहीर मालक शिरवली