शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रिक्त पदांमुळे जव्हार पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:14 AM

आकृतीबंधानुसार ८८ पोलीस शिपाई पंदे मंजूर असून पैकी जव्हार पोलीस ठाण्यात ४२ पोलिस शिपाई पंदे रिक्त आहेत.

जव्हार : जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत एकीकडे गुन्हेगारीमध्ये वाढ होत असताना पोलीस प्रशासनाची तोकड्या कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यामुळे दमछाक होत आहे. दीड लाख लोकसंख्येसाठी अवघे ४६ पोलीस शिपाई, दोन उप पोलीस निरिक्षक आणि एक सहायक पोलीस निरिक्षक अशी प्रत्यक्ष रचना आहे.आकृतीबंधानुसार ८८ पोलीस शिपाई पंदे मंजूर असून पैकी जव्हार पोलीस ठाण्यात ४२ पोलिस शिपाई पंदे रिक्त आहेत. या स्थितीमुळे तोकड्या मनुष्यबळावर अतिरिक्त कामांची जबाबदारी येत आहे. त्यामुळे ही रिक्त पंदे त्वरित भरावीत अशी मागणी होत आहे.तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूली गावे, २५३ पाडे आहेत. मात्र एवढ्या लोकसंख्येची व भौगोलिक क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ४६ पोलिसांवर आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खांबाळा व न्याहाळे ही दोन दूरक्षेत्र आहेत. तर जव्हार, खांबाळा, न्याहाळे, जामसर, तलावली, वाळवंडा, हे ६ बिट आहेत. मात्र पोलिसांच्या अनेक रिक्त पदांमुळे त्यांना प्रत्येक विषयाकडे तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथील पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही कामे करावी लागत आहेत. अतिरिक्त कामामुळे त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. कर्मचारी कमतरतेमुळे नागरिकांचीही कामे वेळेत होत नसल्याची तक्र ार होत असते.तालुक्याच्या ठिकाणी नेहमी राजकीय पक्षांचे आणि विविध संघटनांचे मोचे, आंदोलने आणि रास्तारोको असतो. तसेच, दररोज वाद, भांडण, तंटे, मिटविण्यासाठी गर्दी असते. मात्र वाद, तंटे, भांडण, आणि आठवड्यातून येणारे मंत्री, पुढारी, राजकारणी, अधिकारी वर्ग, यांना सुरक्षा द्यावी लागते. त्यामुळे जव्हार पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई कर्मचारी कमी पडत आहेत.तसेच जव्हार हे पर्यटनस्थळ असल्याने नेहमी पर्यटकांची वर्दळ असल्याने त्यांचीही जबाबदारी पोलिसांवर असते. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील रोजची बिट निहाय कामे पोलिसांना उरकावी लागत आहेत. कर्मचाºयांची कमतरता असल्याने बरेच पोलीस शिपाई बद्दली करूनच जाण्याच्या बेतात आहेत. ज्यांची बद्दली जव्हार पोलीस स्टेशनला होते, तेही यायला तयार नसल्याचे पोलीस निरीक्षकांनी भोये यांनी लोकमतला सांगितले. त्यातच या भागातील दमण दारु, जुगार मटका आदी विषय डोक वर काढताना दिसतात. अशा वेळी कुठे कुठे लक्ष द्यावे असा सवाल पोलिसांचा आहे.जव्हार पोलीस ठाण्याला ८८ मंजूर पंद, यापैकी ४६ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. या रिक्त पदांमुळे आम्हला त्रास सहन करून, पोलिसांचे कामे करावी लागत आहेत. रिक्त पदांचाभार रोजच कामे करणाºया पोलिसांवर पडत आहे.- डी.पी. भोये, पोलीस निरीक्षक जव्हार

टॅग्स :Policeपोलिस