शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

भूकंपानंतर धोका दगडखाणींचा, तलासरी, डहाणूवर नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:08 IST

तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत.

- सुरेश काटेतलासरी  - तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत. भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांच्या हात मिळवणीने हा अनधिकृत धंदा तेजीमध्ये असून भूकंपाने तडे गेलेल्या धोकादायक इमारतींनी दगडखाणीतील जिलिटीन व डायनामाईटच्या स्फोटाचा धोका निर्माण झाला आहे.तलासरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वैध बरोबर अवैध दगडखाणी आहेत. त्यांना महसूल विभागाने उत्खननची परवानगी दिली असली तरी उत्खनन करताना स्फोटकाने दगड काढण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र, शासनाची नियमावली भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे दुर्लक्षित केली जात आहे. त्यातच रात्रंदिवस कधीही हे दणके बसत असल्याने परिसरातील इमारती व घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच, विहिरींची पाण्याची पातळी खोलवर जात आहे. या स्फोटा विरोधात अनेक तक्र ारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत परंतु आर्थिक हित संबंधामुळे महसूल विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.या दगडखाणींचे प्रमाण दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेल्या तालुक्यातील उधवा गावात मोठ्या प्रमाणात आहेत. दादरा-नगर हवेली या भागात दगड खडीला मोठी मागणी असल्याने त्यांची मागणी पुरविण्यासाठी उधव्यातील दगडखाणी दिवस रात्र स्फोटकाचा वापर करून उत्खनन करीत असतात. मात्र, नागरिकांचा जीव धोक्यात असताना कागदी घोडे हलवणारे महसूल अधिकारी ढिम्म असतात.विशेष म्हणजे तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारीचा पाढा वाचला जात असतानाही कारवाई होत नसल्याने इमारती कोसळण्याची वाट पाहत आहात का? असा सवाल विचारला जात आहे.दगडखाणी त स्फोट करण्यासाठी राजस्थान मधील आठ टॅक्टर तलासरीत कार्यरत आहेत. ते तालुक्यात स्फोटक पदार्थ घेऊन विस्फोटाची कार्यवाही करीत असतात. उधाव्यातील दगडखाणी मधुन स्फोटकाने उडालेले दगड जवळच्या कलमदेवी आश्रम शाळेजवळ जाऊन पडत असल्याने विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या विरोधात कलमदेवी ग्रामपंचायतीने या दगडखाणींवर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायती चा ठराव घेऊन तो डहाणू प्रांत कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र, प्रांत कार्यालयानेही त्याची दखल घेतलेली नाही.दुर्देवाची गोष्ट म्हणजे हे राज्यस्थानातील स्फोट करणारे स्थानिकांना नदी व धरणातील मासे पकडण्यासाठी जिलेटिनच्या काड्या खुले आम विकतात. त्याने स्थानिक नदीत व धरणात स्फोट करून मासे पकडत आहेत. परंतु, त्यामुळे धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.जिलेटिनच्या कांड्या मिळतात रस्त्यावरराजस्थानातुन येणाºया स्फोटकाचे वितरण विनापरवाना स्थानिकांना सहज होत असल्याने एखाद्या मोठ्या घातपाताला आमंत्रण मिळत आहे. या विरोधात तक्रारी होऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.तलासरी मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असल्याने अशी जीवघेणी स्फोटके रस्त्यावर विकली जाणे धोक्याचे ठरत आहे. स्थानिक तरुण त्याचा वापर मासेमारीसाठी करीत असल्याचे उघड होत आहे.या भागातील दगडखाणी निर्देशां पेक्षा खूप खोल खोदत असून स्फोटाने घरांना तडे जात आहेत- रणजित कोम,मा.सरपंच, कुरझे ग्रामपंचायतउधव्यातील खदानीतील स्फोटा बाबत अनेक तक्र ारी केल्या आहेत. परंतु, महसूल विभाग कोणतीच कारवाई करीत नाही कुणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?- भानुदास भोये, माजी उप सभापती तथा सदस्य तलासरी पंचायत समिती

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर