ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; साडेपाच कोटींचा माल जप्त, नालासोपारा येथे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:53 IST2025-05-18T14:51:50+5:302025-05-18T14:53:12+5:30

नालासोपारा : प्रगतिनगर परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कारखाना चालविणाऱ्या  नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले ...

Drug factory destroyed; goods worth five and a half crores seized, police action in Nalasopara | ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; साडेपाच कोटींचा माल जप्त, नालासोपारा येथे पोलिसांची कारवाई

ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; साडेपाच कोटींचा माल जप्त, नालासोपारा येथे पोलिसांची कारवाई

नालासोपारा : प्रगतिनगर परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कारखाना चालविणाऱ्या  नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात ड्रग्ज विक्रीच नाही तर मोठ्या प्रमाणात ड्रग तयारही होत असल्याचे समोर आले. एका इमारतीमध्ये घरात हा कारखाना सापडल्याने पोलिसांनी कारवाई केली. 

पोलिस उपनिरीक्षक राहुल फड यांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी नालासोपारा पूर्वेकडील प्रगतिनगर परिसरातील अंशित प्लाझा या इमारतीच्या रूम नं. ४०५ येथे पोलिसांनी छापा टाकला असता घरात ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे आढळले. यावेळी आरोपी नायजेरियन महिला रिटा कुरेबेवाई (वय २६) हिला पोलिसांनी अटक केली. तिच्या घरातून मेफेड्रोन ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असा एकूण ५ कोटी ६० लाख ४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. महिलेचा प्रियकर फरार आहे. 

पोलिस पथकाने ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. एका नायजेरियन महिलेला अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध  सुरू आहे. 
विजय जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुळींज पोलिस ठाणे.

भारतात वास्तव्याचा       व्हिसा नसल्याचे स्पष्ट
आरोपी महिलेकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आढळलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस आयुक्तालयामधील नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या मोठी आहे. 

Web Title: Drug factory destroyed; goods worth five and a half crores seized, police action in Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.