शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांमधून गाळ काढल्याने परिसर पाणीदार; रोजगार हमी योजनेतून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:41 IST

२८० मजुरांना मिळाला रोजगार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील खांड व उघाणी परिसरात बांधण्यात आलेल्या तीन कोल्हापूर टाईप बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पुरामुळे गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडेझुडुपेही वाढली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत या बंधाºयांमधील गाळ काढण्यात आल्याने आता बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मजुरांमार्फत कामे सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायत ओंदेअंतर्गत येणाºया खांड व उघाणी या गावालगतच्या तीन कोल्हापुरी बंधाºयांतून नुकतेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत गाळ काढण्यात आला. हा गाळ जवळजवळ २७० ते २८० मजुरांमार्फत उपासण्यात आला. या मजुरांना दिवसाकाठी सरासरी २०५ ते २०६ रुपये मजुरी मिळाली आहे. या बंधाºयांतील गाळ काढल्याने बंधाºयांचे पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत खुले झाले आहेत. पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात झाला आहे.

बंधारा परिसरालगत असलेल्या शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. शेतीत उन्हाळी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देणे शक्य होणार आहे. येथे नैसर्गिकरीत्या लाभलेले जलस्त्रोत कार्यान्वित केल्याने आता पाण्याची टंचाई भासणार नाही. बंधाºयांलगतचा परिसर पाणीदार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच रोजगार हमीअंतर्गत नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती ओंदे ग्रुप ग्रामपंचायतच्या रोजगार हमी योजनेचे रोजगार सेवक रूपेश जाधव यांनी दिली.

ओंदे ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया खांड व उघाणी येथील रोहयोअंतर्गत मजुरांमार्फत तीन बंधाºयांतील गाळ काढण्यात आला आहे. नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. -वंदना प्रसाद, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत, ओंदे बंधाºयांतील गाळ काढण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्हला ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशी कामे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावीत, जेणेकरून आम्हाला स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल.- मदन शांताराम गोविंद, रोहयो मजूर, खांड

कोल्हापुरी बंधाºयांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडे-झुडुपे वाढली होती. आता गाळ काढल्याने पाणीसाठा होऊन लगतच्या शेतकºयांना पिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.- विलास भाऊ पवार, बंधाºयांलगतचे शेतकरी

ग्रा.पं.ओंदे हद्दीमधील रोहयोअंतर्गत गाळ काढायचे काम झाले. त्यासाठी रोजगार सेवक, ग्रामसेवक, स.का.अधिकारी व तांत्रिक सहाय्यक यांचे मोलाचे योगदान लाभले.-आकाश आळशी, तांत्रिक सहाय्यक

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र