शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

आनंद हिरावून घरातच बसलेल्या बच्चे कंपनीची आता शाळेकडे ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:28 AM

मुलांची उद्विग्न अवस्था; सहा महिन्यांपासून कुठेही जाणे-येणे नाही

विरार : जागतिक कोरोना विघ्नाने सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. या आजारावरील लस विकसित होणार कधी, जनजीवन सुरळीत होणार कधी, असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. यात भर पडली आहे ती शालेय विद्यार्थ्यांची. कोरोनामुळे शाळा सहा महिन्यांपासून बंद आहेत. सहा महिन्यांपासून घरी असलेल्या मुलांना आता वेध लागले आहेत ते शाळेचे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, हा एकच प्रश्न त्या सर्र्वांच्या तोंडी सामावला आहे.मार्च महिन्यात भारतात कोरोनाने शिरकाव केला. तर वसई तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.सुरुवातीपासूनच रेडझोनमध्ये असलेल्या वसईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा फटका सामान्य चाकरमानी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, विद्यार्थी या सगळ्यांनाच बसला आहे.कोरोना आपत्तीमुळे विद्यार्र्थ्यांच्या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमुळे बच्चे कंपनी हिरमुसली आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, हा एकच केविलवाणा प्रश्न ते आपल्या पालकांना विचारत आहेत.दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्या की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्ट्यांचे. मात्र यंदा उन्हाळी सुट्टी सुरू होण्याआधीच कोरोनाने एन्ट्री घेतल्याने निदान जून महिन्यापर्यंत तरी सर्व बंद राहील, असे अंदाज वर्तविण्यात आले होते.कोरोनामुळे शाळा खूप दिवसांसाठी बंद राहणार म्हणून आनंदी झालेली मुले आता कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. घरी बसून कंटाळा आलेली मुले कोरोनामुळे सहा महिन्यांपासून कुठे पाहुणे म्हणून गेलेली नाहीत. आजोळ, मामाचे गाव अशी उन्हाळा सुट्टीत मजा करण्यासाठी ठरलेली गावे कोरोनामुळे या गावांकडे बच्चे कंपनीला जाता आलेले नाही.सिनेमा हॉल, रिसॉर्ट, हॉटेल सर्वच बंद असल्याने सहा महिन्यांपासून गंमतजंमत नावाचा प्रकारच त्यांना अनुभवता आलेला नाही. सध्या मुलांना मिळत असलेल्या आॅनलाइन शिक्षणात राम नसल्याचे पालकांचे गाºहाणे आहे. ग्रामीण भागात नेट स्लो असल्याने मुलांची आॅनलाइन शिक्षणात गैरहजेरी लागत आहे. कोरोनामुळे आनंद हिरावून घेतलेल्या बच्चे कंपनीला आता शाळेची ओढ लागली आहे.