खुनी पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू
By Admin | Updated: December 16, 2015 00:17 IST2015-12-16T00:17:00+5:302015-12-16T00:17:00+5:30
आपल्या पत्नीच्या चारीत्र्याचा संशय घेत कृष्णा कदम (४०) याने आपली पत्नी कल्पीता (३८) हीचा गळा चिरून खुन करून मुलगी जाई (१०) व मुलगा अथर्व (७) यांच्यावरही चाकुने

खुनी पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू
पारोळ : आपल्या पत्नीच्या चारीत्र्याचा संशय घेत कृष्णा कदम (४०) याने आपली पत्नी कल्पीता (३८) हीचा गळा चिरून खुन करून मुलगी जाई (१०) व मुलगा अथर्व (७) यांच्यावरही चाकुने वार करून जखमी करून स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेत स्वत:ला जखमी करून घेणाऱ्या कृष्णा याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार पुर्व भागातील मनवेल पाडा येथील विष्णु विहार इमारतीत हे कदम कुटूंब राहात होते कृष्णा मनवेल पाड्यात भाजीचे दुकान चालवत होता तर कल्पीता मुंबई बांद्रा येथील भाभा हॉस्पिटलमध्ये परिचारीकेची नोकरी करीत होती. शुक्रवारी रात्री ९ वा. च्या सुमारास झोपण्याच्या खोलीत पतीन पत्नीचे भांडण झाले. तेव्हा कृष्णा याने रागाच्या भरात भाजी चिरण्याच्या चाकूने कल्पीतावर वार करून जखमी केले. त्यांची लहान मुले आईला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता कृष्णाने त्यांनाही भोसकले व स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले होते. त्याच्या जखमी मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वरील आई वडीलांच्या मायेचे छत्र हरपल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.