शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

डहाणूचा विकास राष्ट्रवादीनेच केला!, भाजपाचा भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:15 AM

पंचरंगी लढत असलेल्या डहाणू नगर परिषदेसाठीच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून शहराचा विकास आम्हीच केल्याचा दावा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिहीर शहा

डहाणू : पंचरंगी लढत असलेल्या डहाणू नगर परिषदेसाठीच्या प्रचारात राष्टÑवादी कॉँग्रेसकडून शहराचा विकास आम्हीच केल्याचा दावा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिहीर शहा चर्चेमध्ये आले आहेत. त्यांनी आपण गत पाच वर्षामध्ये केलेल्या विकासाचा ग्राफच मांडून प्रमुख विरोधी पक्ष भाजपाला पेचात टाकले आहे. त्यामुळे भाजपाकडून काय भूमिका मांडली जाते हे सुद्धा उत्सुकता वाढवणारे ठरणार आहे.शहरात नगर परिषद हददीत गेल्या पाच वर्षात नागरिकांसाठी सोयी-सुविधा, रस्ते, वीज, पाणी आदी मुलभूत सुविधांबरोबर विविध विकासकामे राष्ट्रवादीनेच केल्याने आज शहर सुशोभित दिसत आहे. विरोधकाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते भ्रष्टाचाराचाचा बिनबुडाचा आरोप करीत असा टोला शहा यांनी लगावला. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षात सुजल निर्मल योजने अंतर्गत पाण्याची सोय केली आहे. सागर नाका येथील तारपा चौकाचे सुशोभिकरण, बालोद्यान, शहरात एलईडी दिवे बसवून डहाणू सुंदर केले, भुयारी गटार, रस्ते काँक्र ीटकरण, डांबरी करण, इत्यादी कामे राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेली असल्याचा ग्राफच त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.येथे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, बविआ याच्यात पंचरंगी लढत असली तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच असल्याचे दिसू लागले आहे. या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीकडून विरोधकांना लक्ष करण्यापेक्षा केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहचवून मतांचा जोगवा मागण्याचे तंत्र अवलंबले आहे. आमदार आनंद ठाकुर, राजेश पारेख, करण ठाकुर, रमेश कर्नावट मतदारांशी संवाद साधून पक्षाची भूमिका व विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले आहे.प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची हजेरी लागणारजव्हार : निवडणूकीचा दिवस जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनिती आखून स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, भाई जगताप, शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील तर भाजप कडून विनोद तावडे, विष्णू सावरा आणि चिंतामण वनगा यांच्या सभा निश्चित केल्या जाणार असल्याची माहिती पक्षीय प्रतिनिधींनी दिली आहे. पालघर जिल्हयातील जव्हार नगरपंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेचे ठरत आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी कमी अवधी मिळाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवरच भर दिला आहे. हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने, नेत्यांच्या सभांच्या तारखांची जुळवाजुळव सुरू केली आहे. दरम्यान, कमी कालावधी आणि हिवाळी अधिवेशनामुळे ८ ते १० डिसेंबरच्या दरम्यान, स्टार प्रचारकांच्या सभा होतील, असा अंदाज आहे. या सभांमुळे या निवडणुकांमधील वातावरण बदलणार असल्याचा विश्वास उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस