शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केळव्यात वधुपित्यासह चौघा जणांविरोधात गुन्हा, आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:05 IST

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.

पालघर : केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये विवाहप्रसंगी परवानगीपेक्षा जास्त लोकांचा सहभाग आढळून आल्याने केळवे सागरी पोलिसांनी वधुपिता चंद्रप्रकाश जैन, रिसॉर्ट मालक, कॅटरर्स यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या मनाई आदेशाचा भंग करून सफाळे येथील वधुपिता चंद्रकांत घेरीलाल जैन यांनी आपल्या मुलीच्या हळदी समारंभासाठी केळवा सागरी पोलिसांकडून २५ लोकांची परवानगी घेतली होती. हा समारंभ केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये शनिवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. संबंधित रिसॉर्टवर हा समारंभ पार पडत असताना प्रत्यक्षात मात्र जास्त लोकांचा सहभाग आढळला. या प्रकरणी केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी दिनकर मोढवे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना २५ हजारांचा दंड ठोठावला. यावेळी वधुपिता, रिसॉर्ट मालक, पुनीत कॅटरर्सचे मालक, मंडप डेकोरेटर्स या चार लोकांविरोधात शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयदीप सांबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस नाईक शिरसाट हे करीत आहेत.

लग्नसमारंभांवर बडगा   राजस्थान येथे लग्नसमारंभास गेलेले जिल्ह्यातील अनेक जण कोरोनाबाधित झाले होते. यानंतर लग्नसमारंभात गर्दी करणाऱ्यांवर, वर-वधुपिता, कॅटरर्स, डेकोरेटर्स, रिसॉर्ट मालकांविरोधात कारवाईचा बडगा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी उचलला आहे. शिरगाव, नांदगाव, सातपाटी, उमरोली,  माकूणसार आदी भागांतील लग्न समारंभांवरही कारवाई झाली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसVasai Virarवसई विरार