अर्नाळा समुद्रात जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीला वाचवले तर मुलाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 23:32 IST2024-07-27T23:32:23+5:302024-07-27T23:32:34+5:30
Nasopara News: अर्नाळा समुद्रात उडी मारून एका अल्पवयीन जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. एका स्थानिक जीवरक्षकाने मुलीला वाचविण्यात यश मिळवले आहे. मात्र मुलगा बुडाला असून त्याचा शोध सुरू आहे.

अर्नाळा समुद्रात जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीला वाचवले तर मुलाचा शोध सुरू
- मंगेश कराळे
नालासोपारा - अर्नाळा समुद्रात उडी मारून एका अल्पवयीन जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. एका स्थानिक जीवरक्षकाने मुलीला वाचविण्यात यश मिळवले आहे. मात्र मुलगा बुडाला असून त्याचा शोध सुरू आहे.
विरार पश्चिमेला राहणारे १७ वर्षांचे एक अल्पवयीन जोडपे तीन दिवसांपूर्वी घर सोडून पळून गेले होते. शनिवारी अर्नाळा सागरी पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. दोघांचे जबाब नोंदवून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते.
संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे जोडपे अचानक नजर चुकवून पोलीस ठाण्यासमोर असलेल्या समुद्रकिनारी केले आणि समुद्रात उडी मारली. स्थानिकांनी बुडणाऱ्या मुलीला वाचवले तर बुडालेल्या मुलाचा शोध सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.