शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

coronavirus : मायदेशी परतण्याची व्यवस्था करा! यूकेत शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची सरकारला साद!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:54 PM

युकेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची मायदेशी माघारी येण्याची धडपड सुरू झाली आहे.त्यांच्यासह तेथे देशातील अन्य सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी -  यूके येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथे शिकण्याकरिता गेलेल्या पालघर जिल्हयाच्या डहाणू तालुक्यातील विद्यार्थ्याची मायदेशी माघारी येण्याची धडपड सुरू झाली आहे.त्यांच्यासह तेथे देशातील अन्य सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र विमान सेवा ठप्प झाल्याने परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. प्रत्येक दिवस दहशतीखाली जगत असून, जीवाला धोका वाढल्याने शासनाने माघारी परतण्याची तत्काळ व्यवस्था करावी अशी विनवणी त्यांनी केली आहे.   डहाणूतील निकेत धांगकर(वय,29, डहाणू शहर) हा विद्यार्थी गतवर्षी सप्टेंबर मध्ये शिप ऑफिसरच्या अभ्यासक्रमासाठी युके येथे गेला होता. या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यात तेथे कोरोनाचा प्रभाव वाढल्याने तेथील प्रशासनाने 31 जुलैपर्यंत कॉलेज बंद केले आहे. तर प्रेसिडेंट आणि राणीला या आजाराची लागण झाल्याने सामान्यांची स्थिती भयावह होऊन सर्वांचे अवसान गळले आहे. रोज नवनवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. साऊथ हॅमटन येथे सेल्फ कोरनटाईन असलेल्या मुंबईतील सत्तावीसजणांसह देशभरातल्या विविध राज्यातल्या सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असताना या विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्यासाठी आरक्षित केलेली विमानांची तिकीट रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे स्वतः प्रमाणेच मायदेशी कुटुंबीय आणि नातेवाईकांची परिस्थिती दयनिय बनली आहे. देशात लॉक डाऊन असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्याने पेच अधिकच वाढला आहे. दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाने विशेष विमानाची व्यवस्था करून सर्वांना मायदेशी परत बोलविण्याची तत्काळ व्यवस्था करावी अशी विनंती या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे  व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडIndiaभारतVasai Virarवसई विरार