शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

CoronaVirus: आयडियाची कल्पना! संसर्ग टाळण्यासाठी सोसायटीनं शोधला अनोखा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 5:18 PM

कोरोनाला रोखण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी सोसायटीनं शोधली शक्कल

- प्रतिक ठाकुर 

वसई–विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना, शहरातील काही सोसायट्यांनीसुद्धा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. विरारच्या एका सोसायटीमध्ये चक्क एका भाजी विक्रेत्याने बस्तान मांडले होते. विशेष म्हणजे रहिवाशांच्या संमतीने हा भाजी विक्रेता सोसायटीत बसला होता. रस्त्यावर व भाजी मार्केटमध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजी विक्रेत्याला सोसायटीत बसण्यास परवानगी दिली. 

कोरोना विषाणूमुळे राज्य व जिल्हा प्रशासनाकडून शहर लॉकडाऊन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जीवनावस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व बंद करण्यात आले. मात्र तरीदेखील दररोज नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर व भाजी मार्केटमध्ये गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विरार पश्चिमेच्या विनय युनिक रेसिडेन्सी या इमारतीच्या रहिवाशांनी सोसायटीत एका भाजी विक्रेत्याला भाजी विक्रीसाठी जागा दिली. त्यानुसार हा भाजीवाला रोज सोसायटीत दोन तास भाजी विक्री करतो. या भाजी विक्रेत्याकडे नागरिक भाजीसाठी गर्दी न करता, एकमेकांमध्ये काही अंतर ठेवून खरेदी करत आहेत.

या सोसायटीत सहा इमारती आहेत. या सहामधील एका इमारतीत शंभर घरे अशी एकूण ६०० कुटुंब राहतात. ही ६०० कुटुंब जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडल्यास रस्त्यांवर व भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दीही होईल. या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांनी यावर विचार करून एका भाजी विक्रेत्याला सोसायटीत भाजी विक्रीसाठी आमंत्रण दिले. त्यामुळे आता दररोज हे रहिवासी आपल्या सोसायटीतच सोयीप्रमाणे गर्दी न करता भाजी खरेदी करत आहेत. या उपक्रमामुळे ही ६०० कुटुंब फारशी सोसायटीबाहेर पडत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्गही काही प्रमाणात रोखता जात आहेत. इतर सोसायट्यांनी या उपक्रमाचे अनुकरण केल्यास नक्कीच शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. 

आमच्या सोसायटीत सहा इमारती असून यामध्ये सहाशे कुटुंब राहत आहेत. हे सर्व सोसायटीचे रहिवाशी भाजी खरेदीसाठी भाजी मार्केटमध्ये जात होते. मात्र आधीच मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी असायची. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आम्ही भाजी विक्रेत्याला सोसायटीत बोलावून घेतले. आता सोसायटीचे रहिवासी बाहेर न जाता सोसायटीतच भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे आम्ही कोरोनाचा संसर्ग टाळत आहोत.विनोद सावंत, सोसायटी सेक्रेटरी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस