शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 4:48 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: पालघर जिल्ह्यातील वसई रोड शहरांमधून उत्तरप्रदेश मधील गोरखपूर येथे जाणारी पहिली लांब पल्ल्याची विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री 4 वाजता सोडण्यात आली.

आशिष राणे

वसई - संपूर्ण जगात व देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक व लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत कामगार- मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या पश्चिम रेल्वे प्रशासनाने पालघर जिल्ह्यातील वसई रोड रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेश राज्याच्या गोरखपूर शहरासाठी (0957) पहिली विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री उशिरा 4 वाजता रवाना झाल्याची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी लोकमतला दिली.

शनिवारी मध्यरात्री रवाना झालेली ही गाडी महाराष्ट्र राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश ,राजस्थान आणि उत्तरप्रदेश अशा चार राज्यांतून जाणार आहे तसेच ही गाडी साधारण 4 मे रोजी दुपारी 2 वाजता गोरखपूर स्थानकात पोहचेल.  टाळेबंदीच्या काळात पालघर जिल्ह्यांच्या विविध भागात खास करून वसई व नालासोपारात मजूर व कामगार वर्ग अडकून पडले होते. दरम्यान 22 डब्यांच्या या विशेष गाडीत एकूण 1200 प्रवासी असून या प्रवासासाठी 740 रुपये तिकीट आकारण्यात आले आहे. तर लॉकडाऊन नंतर जिल्हयात व वसई- नालासोपारात अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी पालघर जिल्ह्यातून वसई स्थानकातून शनिवारी सुटलेली ही पहिलीच रेल्वे गाडी असल्याने या स्थलांतरीत कामगार व मजुरांनी सरकार स्थानिक प्रशासनाचे विशेष आभार ही मानले.

पालघर जिल्हा व स्थानिक पोलीस व महापालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

वसईतून सुटणाऱ्या या गाडीसाठी विशेष व्यवस्था म्हणून पालघर जिल्हा तथा वसई महसूल विभाग आणि वसई विरार महापालिका व माणिकपूर पोलीस यांच्या कडून शनिवारी संध्याकाळ पासूनच चोख बंदोबस्त व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. या गाडीतून स्थलांतरित केले जाणारे मजूर व कामगार यांना प्रथम विविध भागातून नवघर एस टी स्थानकात आणण्यात आले व सोशल डिस्टंसिंग पाळून त्यांची प्रथम आरोग्य तापसाणीची देखील चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी या मजुरांना सोबत प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर,चेहऱ्यावर मास्क, प्रसंगी जेवण पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली होती. वसई रोड स्टेशनचे रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस  व सोबत वसई विरार मनपा, वसई महसूल चे तहसीलदार व माणिकपूर पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्याकडे अजून काही नोंदी होत आहेत आतापर्यंत 32 हजार स्थलांतरित कामगार व मजुरांच्या  नोंदी झाल्या आहेत, केंद्र व राज्य सरकारचे पुढील आदेश येतील त्यानुसार आमचे नियोजन सुरू आहे. रेल्वेचे काही आदेश आले की तशी व्यवस्था आम्ही पुन्हा करू शनिवारी सुद्धा गोरखपूरसाठी 1200  कामगार रात्री ४ वाजता रेल्वे गाडी सुटून हे रवाना झाले आहेत.

- स्वप्नील तांगडेवसई प्रांताधिकारी ,वसई उपविभाग

 

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस