शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

Coronavirus : डाय मेकिंग व्यवसाय कोरोनामुळे संकटात, डहाणूतील लघुउद्योग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:22 AM

सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार कोरोनाच्या भीतीमुळे महिनाभरापासून ग्रामीण भागात येतच नसल्याने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील पंचवीस ते तीस गावातील हजारो कुशल-अकुशल कारागीरांसोबत मजुरांवर बेकारीची कु-हाड कोसळली

- शौकत शेखडहाणू : दिवसेंदिवस वाढणाऱ्या सोन्याच्या भावामुळे आधीच संकटात सापडलेल्या डहाणूच्या डायमेकिंग व्यवसायाला आता कोरोनाचा फटका बसला आहे. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, तामिळनाडू, राजस्थानबरोबरच देशविदेशातून येणारे सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार कोरोनाच्या भीतीमुळे महिनाभरापासून ग्रामीण भागात येतच नसल्याने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील पंचवीस ते तीस गावातील हजारो कुशल-अकुशल कारागीरांसोबत मजुरांवर बेकारीची कु-हाड कोसळली असून डायमेकिंगसारखा लघुउद्योग ठप्प झाला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गाव, खेड्यापाड्यात ८० वर्षांपासून डायमेकिंगचा व्यवसाय घरोघरी सुरू आहे. शासकीय किंवा खाजगी नोकरी करण्यापेक्षा वडिलोपार्जित आणि पारंपरिक व्यवसायात उच्च शिक्षण घेतलेले हजारो सुशिक्षित तरुण दिवसभर अंगमेहनत करून लोखंडी साचे तयार करीत असतात. डायची किंमतही चांगली मिळत असल्याने दिवसभरात पैशाची चांगली आवक होते. सुंदर कलाकुसर असलेले हे साचे प्रसिद्ध असल्याने सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार येथे येत असतात. काही तरुण हे साचे नेपाळ, दुबई, श्रीलंका, बांगलादेश, सिंगापूर, मलेशियाबरोबरच देशातील विविध राज्यात नेऊन त्याची विक्री करतात.कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मोठमोठ्या शहरातील सोन्या-चांदीचे दुकाने कारखाने बंद झाल्याने ग्राहक किंवा दलाल डायची आॅर्डर देण्यासाठी येत नाहीत. शिवाय तयार झालेले डाय घेण्यासाठी तयार नसल्याने आमची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. तसेच काम नसल्याने व्यवसाय बंद ठेवला आहे.गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने हजारो हातांना काम देणारा डायमेकिंग व्यवसाय आता संकटात सापडला आहे. बाहेरील राज्यातून येणारे ग्राहक भीतीमुळे बाहेर पडत नसल्याने तसेच काही राज्यात सोन्या-चांदीचे दुकान बंद असल्याने लोखंडी साच्याची मागणी पूर्णपणे घटली असून येथील हजारो डायमेकर्सवर रिकामे बसण्याची वेळ आली आहे. यामुळे डायमेकिंगसाठी आवश्यक त्या महागड्या मशीनचे मशीनचे हप्ते कसे भरणार या भीतीने डायमेकर धास्तावला आहे.विक्रमगड येथे शासकीय कार्यालयातही गर्दी टाळण्याच्या सूचनाविक्रमगड : कोरोनाशी लढण्यासाठी खबरदारी हाच उत्तम पर्याय असल्याने विक्रमगड येथील बाजारपेठ बंद करण्यात आली. तसेच मोह आणि शेवता आरोग्य विभागाच्या इमारतीत येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीधर गालिपिली यांनी दिली.डहाणूत कोरोनाचे दोन संशयित? : डहाणू : कोरोनाचे दोन संशयित डहाणूत आढळल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून हे दोन्ही रुग्ण उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण विभागाच्या वैद्यकीय निगराणीत आहेत. त्यांचे वैद्यकीय नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. थायलंड येथून संबंधित संशयित १० मार्च रोजी मुंबईत आला होता.१३ मार्च रोजी डहाणू तालुक्यातील राई येथे आल्यावर १६ मार्च रोजी सर्दी, खोकला, ताप आल्यानंतर त्यांना कॉटेज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोन्ही संशयित पिता - पुत्र असल्याचे समजते. कोरोना संबंधित तपासण्या करण्यात आल्या असून याबाबतचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी दिली.दरम्यान, डहाणू तालुक्यातील बोर्डी, घोलवड, टोकेपाडा, पटेलपाडा, राई, चिंचणी येथील १२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. हे सर्वजण परदेशातून आल्याचे समजते. याबाबत प्रशासन सतर्क झाले असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार