CoronaVirus News: वसई-विरारमध्ये ३१ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 04:44 IST2020-06-15T04:43:59+5:302020-06-15T04:44:10+5:30

पालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १५०७ वर

CoronaVirus 31 new corona patient found in Vasai Virar | CoronaVirus News: वसई-विरारमध्ये ३१ नवे रुग्ण

CoronaVirus News: वसई-विरारमध्ये ३१ नवे रुग्ण

वसई : वसई-विरार शहरात रविवारी ३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता पालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १५०७ वर पोहचली आहे. मात्र त्याच वेळी दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

वसई-विरार हद्दीत रविवारी १७ पुरुष आणि १४ महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात वसई ११, नालासोपारा १० तर विरारमध्ये १० असे एकूण ३१ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात कोरोनावर मात करून २१ रुग्ण बरे झाले आहेत. यात वसई -१, नायगाव २, कामण १ असे एकूण ४ तर नालासोपारा-६ आणि विरार ११ अशा एकूण २१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आता एकूण मुक्त रुग्णांची संख्या ७६५ झाली आहे. तर आतापर्यंत शहरात विविध रुग्णालयांत एकूण ६८९ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: CoronaVirus 31 new corona patient found in Vasai Virar