शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

डिसेंबरअखेरपर्यंत पाणी योजना पूर्ण करा, अन्यथा कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:58 AM

वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले

वाडा : वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले असून डिसेंबर अखेरपर्यंत ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदाराला दिले आहेत. ही योजना रखडल्याने नागरिकांना मुबलक तसेच शुद्ध पाणी मिळत नाही. या रखडलेल्या पाणी योजनेवर चर्चा करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एल. लंबाते यांनी गुरुवारी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार यांची एक बैठक बोलावली होती.या रखडलेल्या योजनेवर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांनी जिल्हा परिषदेत अनेकदा आवाज उठवला. पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी एम.एल.लंबाते यांनी त्याची दखल घेऊन यावर चर्चा करण्यासाठी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी व ठेकेदार यांची एक बैठक बोलावून पाणी योजनेचे काम का रखडले याची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही योजना तीन वर्ष रखडल्याचा आरोप करून पाणी योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईपही निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले.त्यानंतर कार्यकारी अभियंता लंबाते यांनी पाणी योजना तत्काळ होणे महत्त्वाचे असून, यापुढे होणारी कामे ही चाचणी करूनच शासनाच्या नियमाप्रमाणे करणे ठेकेदाराला बंधनकारक असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले. काम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही लंबाते यांनी संबंधित ठेकेदार संदेश बुटाला यांना दिला. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके, माजी उपसभापती तथा विद्यमान पं.स. सदस्य जगन्नाथ पाटील, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी.एस.कुलकर्णी, शाखा अभियंता निलेश पाटील आदी उपस्थित होते.>तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने अनेक कामगारांनी कुडूस हे केंद्र मानून येथे राहणे पसंत केले. त्यामुळे या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. आजमितीस या गावाची लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. पूर्वी असलेली नळ पाणी पुरवठा ही गावाला पाणी पुरवण्यास असमर्थ ठरल्याने २०१३ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कुडूससाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर विहीर, पाण्याच्या टाक्या असे काम करण्यात आले. मात्र उर्वरित कामे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत झाली नाहीत. तीन वर्षांपासून या योजनेचे काम रखडले ते आतापर्यंत. मुख्य आणि अंतर्गत पाईपलाईन, जलशुध्दीकरण यंत्र अशी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत.