शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पालिका तरण तलावातील मुलाच्या बुडून मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर

By धीरज परब | Updated: May 12, 2025 12:18 IST

ठेका रद्द करण्यासह संबंधित अधिकारी यांना नोटीस बजावणार  

- धीरज परब

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड-  मीरा भाईंदर महापालिकेच्या स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील तरणतलावात १० वर्षांच्या ग्रंथ मुथा ह्या मुलाच्या बुडून मृत्यूप्रकरणी महापालिका आयुक्त यांनी नेमलेल्या तिघा अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. अहवालात ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासह अनामत रक्कम जमा करावी आणि संबंधित अधिकारी ह्यास नोटीस बजावून खुलासा मागवावा आदी कार्यवाहीची शिफारस नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.  भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट जवळ असलेले महापालिकेचे क्रीडा संकुल साहस चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस चालवण्यास दिले आहे. २० एप्रिल रोजी ग्रंथ हा तरण तलावात पोहताना बुडून मरण पावला होता. या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊन नवघर पोलीस ठाण्यावर निषेध फेरी काढली होती. तर नवघर पोलिसांनी ठेकेदार, व्यवस्थापन वर्ग व चार प्रशिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.  

 दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी २१ एप्रिल रोजी महापालिकेने ईमेलद्वारे ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली असता ठेकेदाराने खुलासा पाठवला. आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी २३ एप्रिल रोजी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांच्या अध्यक्षते खाली  शहर अभियंता दीपक खांबित, क्रीडा अधिकारी दिपाली जोशी यांची चौकशी समिती नेमली. 

त्यात आयुक्तांनी ठेकेदार सोबत केलेल्या करारनाम्यातील अटी शर्तींचे पालन होत आहे का? तपासणे, तरण तलाव येथे आवश्यक जीवरक्षक व सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनाचा आढावा घेणे, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तपासणी ,  खेळा बाबतचे सर्व दस्तऐवजची पाहणी, क्रीडा विभागाची जबाबदारी, चौकशीनंतर कार्यवाहीची शिफारस तसेच आवश्यकता वाटल्यास इतर बाबींची चौकशी आदी मुद्देच आयुक्तांनी ठरवून दिले होते. 

समितीने या प्रकरणी चौकशी करून आयुक्तांना आपला अहवाल सादर केला आहे. सदर अहवालात ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासह त्याची पालिकेतील अनामत रक्कम जप्त करणे आणि पालिकेच्या संबंधित अधिकारी ह्यास नोटीस बजावून खुलासा मागवणे आदी बाबी नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्तांकडे अहवाल सादर केला गेल्याने ते सोमवारी वा चालू आठवड्यातच त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर क्रीडा संकुल आणि तेथील हॉटेल हे पालिकेने ठेकेदारास बंद करण्यास सांगितल्याने ते बंद केले गेले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक