शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आयुक्त आले पण कार्यालय कुठे? आयपीएस अधिकारी सदानंद दातेंना करावी लागणार प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 12:39 IST

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती शासनाने मीरा भाईंदर व वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. परंतु पोलीस आयुक्तालय कार्यालयासह अनेक उणिवा असल्याने सदर घोषणा केवळ कागदावरच राहिली होती.

मीरा-भाईंदर - केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची ‘घरवापसी’ झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्त पदावर दाते यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी तसे गृहविभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश पारित केले.

मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालया साठी शासनाने पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती केल्यानंतर गुरुवारी स्वतः दाते यांनी मीरारोड मधील कार्यालयासाठीच्या इमारतीची पाहणी करून ती जागा निश्चित केली आहे. दाते यांना आयुक्त म्हणून बसण्यास कार्यालयच नसल्याने त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात बसून गुन्हे, समस्या, पोलीस बळ आदींचा आढावा घेतला.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती शासनाने मीरा भाईंदर व वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. परंतु पोलीस आयुक्तालय कार्यालयासह अनेक उणिवा असल्याने सदर घोषणा केवळ कागदावरच राहिली होती. महाविकास आघाडी शासन आल्यावर आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन आदींनी पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली होती. शासनाने या पोलीस आयुक्तालयासाठी सदानंद दाते यांच्या रूपाने पहिला पोलीस आयुक्त दिला असून गुरुवारी दाते यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात येऊन कामकाजास सुरवात केली. यावेळी त्यांच्या सोबत ठाणे व पालघर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते .

दाते यांनी दोन्ही शहरातील गुन्हेगारी, गुन्हे तसेच समस्यांचा आढावा घेतला . पोलीस ठाणे आणि बळ जाणून घेतले . पोलीस आयुक्तालयाच्या अनुषंगाने कामकाज व नियोजना बाबत चर्चा केली. पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालयासाठी मीरारोडच्या प्लेझेन्ट पार्क भागातील भूखंड राखीव ठेवण्यात आला असला तर सध्या मात्र आयुक्तांच्या कार्यालयासाठी जागाच नाही. वास्तविक मीरारोडच्या रामनगर येथील पालिका इमारतीत पोलीस आयुक्तालय सुरु करण्याचा निर्णय झाला होता. परंतु महापालिकेने सदर इमारतच अजून रिकामी करून दिलेली नाही. दाते यांनी आज सदर इमारतीची पाहणी केली व सदर ठिकाणी पोलीस आयुक्तालय सुरु करण्याची तयारी दाखवली आहे. या शिवाय त्यांनी कनकिया येथील पालिका इमारतीची पाहणी केली परंतु राम नगर इमारतीला त्यांनी पसंती दिली आहे असे सूत्रांनी सांगितले. सदर इमारत पालिका रिकामी करून देईल त्या नंतरच कार्यालय सुरु करता येणार असल्याने तो पर्यंत दाते हे कार्यालय विनाचे पोलीस आयुक्त ठरतील.

कोण आहेत सदानंद दाते?

सदानंद दाते हे आयपीएस १९९० बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी राज्यासह सीआरपीएफ आणि सीबीआयमध्येही सेवा बजावली आहे. २००७ मध्ये सदानंद दाते यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केले आहे. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी कामा हॉस्पिटलमधील अनेक महिला आणि लहान मुलांचे प्राण वाचवले होते. या हल्ल्यात सदानंद दाते जखमीदेखील झाले होते. सदानंद दाते  हे मितभाषी, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी सीबीआयसह, मुंबई क्राइम ब्रॅँच, फोर्स वन मधील जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. केंद्रीय न्याय विभागात दाते हे सहसचिव म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत होते. फेब्रुवारी २०२० मध्ये मुदत संपल्यानंतर ते तातडीने दिल्लीहून परतले. फेब्रुवारी पासून त्यांना सरकारने सक्तीच्या प्रतीक्षेत (कम्पल्सरी वेटिंग) राहावयास ठेवले होते.  मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेत सहआयुक्त म्हणून काम पाहात असताना, त्यांची २५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्लीला न्याय विभागात प्रतिनियुक्ती झाली.

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर