पालघर, वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:09 IST2020-12-14T20:37:13+5:302020-12-14T23:09:35+5:30
१८ जानेवारीला होणार मतमोजणी

पालघर, वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू
- आशिष राणे
वसई: पालघर तालुक्यातील सागावे तर वसई तालूक्यातील पाली व सत्पाळा अशा एकूण तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या असून शुक्रवार दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 या वेळेत या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दि.11 डिसेंम्बर पासून निकाल जाहीर होईपर्यंत या सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
दि.18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार असून दि.21 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासन वतीने देण्यात आली.